मद्य परवाने मंजुर करतांना झालेल्या गैरव्यवहाराची होणार चौकशी

7

विशेष तपास पथक गठीत

7 व 8 एप्रिल रोजी विशेष तपास पथकाकडे करता येणार तक्रार

चंद्रपूर : जिल्ह्यातील मद्य परवाने मंजुर करतांना मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरीच्या प्रकरणी तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे.

.     तपासाच्या अनुषंगाने 7 व 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विशेष तपास पथक (SIT) अध्यक्ष संदिप दिवाण हे तपास पथकासह चंद्रपूर विश्राम गृह येथे येत आहेत.

.     चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविल्यानंतर (शासन अधिसूचना दिनांक 8 जून 2021 नंतर) जिल्ह्यात नुतनिकरण करून कार्यान्वीत करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या / इतर जिल्ह्यातून स्थलांतरीत होवून आलेल्या अनुज्ञप्ती (प्रकारानुसार : सीएल-3, एफएल-3, एफएलबीआर-2 इ.) या आक्षेपाबाबत आणखी काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपाच्या अनुषंगाने काही माहिती असेल, अशा व्यक्ती / तक्रारदार हे त्यांचेकडील कागदपत्रांसह विशेष तपास पथकास (SIT) 7 व 8 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेस चंद्रपूर विश्राम गृह येथे समक्ष येवून भेटु शकतात, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.