ब्रम्हपुरी : ओबीसी समाजाचे संघटक व सुधारक ढोरे हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. सेवानिवृत्ती पर त्यांचा सत्कार हनुमान मंदिर देवस्थान ओम नगर यांचे वतीने करण्यात आले .याप्रसंगी ढवस गीताचार्य गुरुकुंज मोझरी यांनी यथोचित मार्गदर्शन केले.
. याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रा प्रकाश बगमारे आणि सहकारी महेंद्र मातेरे, डाकराम ठाकरे, प्रा जुमडे, घनश्याम कावडे, संजय काकडे, मधुकर सहारे, भगवान कन्नाके, विनोद बगमारे, उरकुडे व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी नेते प्रा प्रकाश बगमारे यांनी ढोरे हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले परंतु त्यांचा पिंड हा समाजसेवेचा असल्यामुळे त्यांनी आपलं समाजसेवेचे कार्य सुरू ठेवावे आणि आपलं उत्तरदायित्व पार पाडावे व त्यांना निरोगी आयुष्य लाभावे अशी शुभेच्छा व परमेश्वरा जवळ प्रार्थना प्रा केली. अनेक मान्यवरांनी ढोरे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांना निरोगी आयुष्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या.


