Home सामाजिक वीर बाबुराव शेडमाके केवळ आदिवासी समाजाचे क्रांतिकारक नसून बहुजनांचे क्रांतिकारक – आ....

वीर बाबुराव शेडमाके केवळ आदिवासी समाजाचे क्रांतिकारक नसून बहुजनांचे क्रांतिकारक – आ. रामदास मसराम

1013

वासेरा येथे वीर बाबुराव शेडमाके जयंती समारोह

सिंदेवाही : गोंड या आदिवासी समाजात जन्मलेले आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढून त्यांना सडो की, पळो करून सोडणारे , स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय बंडखोर, आणि मध्य भारतातील गोंड सरदार वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके हे केवळ आदिवासी समाजाचेच क्रांतिकारक नसून ते समस्त बहुजन समाजाचे क्रांतिकारक असल्याचे मत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी व्यक्त केले. ते वासेरा येथील गोंडवाना महासंमेलन तथा वीर बाबुराव शेडमाके जयंती समारोह प्रसंगी बोलत होते.

.     इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात गोंडवानातून बुलंद आवाज गरजला होता. ब्रिटिश काळात जनतेवर अन्याय अत्याचार सुरू होते. जनतेकडून अवाजवी कर वसूल केला जायचा. हा अन्याय बघून वीर बाबुराव शेडमाके यांचे रक्त सळसळत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन जंगोम सेना उभी केली. आणि त्या माध्यमातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले असल्याचेही प्रतिपादन आमदार रामदासजी मसराम यांनी केले आहे. २७ व २८ मार्च रोजी जागतिक गोंड सगा मंदी शाखा वासेरा च्या वतीने कोया पुनेम संमेलन तथा वीर बाबुराव शेडमाके यांचे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी पर्यवेक्षक अमित केराम, सत्कारमूर्ती तथा उदघाटक म्हणून आरमोरीचे आमदार रामदास मसराम विशेष अतिथी म्हणून मुरलीधर मडावी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मडावी, गोंडी साहित्यिक रमेश कोरचा, वासेरा ग्राम पंचायत सरपंच दिलीप मेश्राम निशांत बंडीवर, महेंद्र सूर्यवंशी, सुनील पेंदाम, घनश्याम पेदाम, भरत मडावी, संतोष पेंदाम, वाल्मीक पेंदाम, सुरेश पेंदाम, शामराव कोवे, व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

.    कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र तलांडे आभार प्रदर्शन सत्यवान पेंदाम यांनी केले. तर रात्री ९ वाजता विदर्भस्तरीय गोंडी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विदर्भातील अनेक जिल्ह्यातून समूह येऊन आपल्या गोंडी नृत्याचा आविष्कार केला आहे. विजेत्या समूहांना योग्य बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभा मसराम, सुनिता आडे, दुर्गा तलांडे, वर्षा वेटे, अस्मिता पेंदाम, इंदू आडे, नंदा कुसाम, वनिता सोयाम, मेघा पेंदाम, विजू केराम, योगिता कोडापे, पुष्पा वलके, कविता मसराम इत्यादींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!