Home चंद्रपुर जिल्हा विशेष राष्ट्रीय संघर्ष समितीचे एकदिवसीय धरणे आंदोलन

राष्ट्रीय संघर्ष समितीचे एकदिवसीय धरणे आंदोलन

1043

चंद्रपुर : अखिल भारतीय राष्ट्रीय संघर्ष समिती च्या वतीने पीएफ ऑफिस चंद्रपुर च्या समोर भर उन्हात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. राष्ट्रीय संघर्ष समिती जिल्हा चंद्रपूर चे वतीने पेन्शन वाढ करणे बाबत धरणे आंदोलन करून पी एफ  कार्यालय चंद्रपूर मार्फत केंद्रीय ईपी एफओ कार्यालय दिल्ली यांना निवेदन देण्यात आले.

.        पेन्शन धारकांना फक्त आठशे ते 4 हजार रुपये मिळतात. ज्यांनी उमेदीच्या काळात आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. मात्र आज वृद्धापकाळात अल्प पेन्शन वर जिवन जगण्याची वेळ आली आहे. आजच्या महागाई च्या काळात पती पत्नी चा मेडिकल खर्च सुध्दा सदर पेन्शन मध्येभागत नाही. भारतात असे 186 डीपारमेंट आहेत व त्यांचे सभासद 78 लाख आहेत तसेच त्यांचे पेन्शन फंडांमध्ये पैसे सुध्दा कटलेले आहेत. म्हणून संघटने तर्फे दर महा 7500/बेसिक त्यावर महागाई आणि पती पत्नी ला मेडीकल सुविधा अशी मागणी करून 6वर्ष झाले मुख्यालय बुलढाणा येथे उपोषण सुरू आहे.  संघटनेने या संसद अधिवेशन काळात आमची मागणी मंजूर करावी अशी विनंती ईपीएफओ केंद्रीय कार्यालय दिल्ली यांना सुध्दा विनंती केली आहे.

.     पी.एफ कार्यालय चंद्रपूर समोर भरउन्हात धरणाआंदोलन करून निवेदन देण्यात आले. पेन्शन वाढ करणे बाबत या पुर्वी अनेक खासदार, केंद्रीय अर्थमंत्री, कामगारमंत्री, पंतप्रधान यांना सुध्दा अनेक निवेदन व प्रत्यक्ष भेटी घेऊन पेन्शन वाढ बाबतमागण्या केलेल्या आहेत. व अनेक खासदारांनी संसदेत प्रश्न सुध्दा लाऊन धरले आहेत मात्र आज पावेतो पेन्शन वाढ झाली नाही म्हणून संघटनेने आज भर उन्हात धरणा आंदोलन करुन पी एफ  कार्यालय चंद्रपूर मार्फत केंद्रीय ईपी एफओ कार्यालय दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष परशुराम तूंडलवार, महारष्ट्र प्रदेश उपाधक्ष अरुण  जमदाडे, जिल्हा सचिव प्रकाश राठोड, वरोरा तालुका अध्यक्ष निळकंठ आमटे, उपाध्यक्ष मेघश्याम ताजने, दिपक जोगी, दौलत साठोने, राऊत, आधे, दाडमल, गड्डावार व बहुसंख्य सभासद हजर होते.

error: Content is protected !!