Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैध गौण खनिज उत्खननाच्या कारवाईतून शासनाला 1 कोटी 7 लाखाचा महसूल

अवैध गौण खनिज उत्खननाच्या कारवाईतून शासनाला 1 कोटी 7 लाखाचा महसूल

1089

वर्षभरात 93 वाहनांवर कारवाई

वरोरा : वर्षभरात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या 93 वाहनावर कारवाई करण्यात आली असून, यातून एक कोटी 6 लाख 87 हजार 740 रुपयांचा दंड ठोठावत शासनाला महसूल प्राप्त झाला.

.      बेकायदेशीररीत्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व अवैध गौण खनिजावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरोरा महसूल प्रशासनाकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी कोतवाल यांचा या पथकात समावेश असून या पथकाकडून वर्षभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या माध्यमातून दिनांक – 1/4/2024 ते 9/3/2025 या कालावधीमध्ये 93 अवैध रेती उत्खन्न व वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 1 कोटी 6 लाख 87 हजार 740 रुपये एवढा महसूल शासनास मिळाला आहे. पोलीस विभागाने पकडलेली सहा वाहने न्यायालयाव्दारे सुपूर्त नाम्यावर सोडण्यात आले आहे. सदर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 48 (7) अन्वये तहसील स्तरावरुन शास्तीची कारवाई सुरु करण्यात आली असून सदर वाहने पुन्हा जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

या वाहनांचा होणार लिलाव                                                                                                                                                         जप्ती कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचे वाहन मालक यांनी दिनांक 20 मार्च, 2025 पर्यत शास्तीची रक्कम न भरल्यास त्यांची वाहने लिलाव करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.                 

1) MH-27-BX-70012) MH-34-BG-4753

3) MH-34-AB-0855 4) MH-32-A-5734

5) MH-34-M-2005

error: Content is protected !!