Home चंद्रपुर जिल्हा विशेष वासेरा येथे आता पट्टेदार वाघाची दहशत

वासेरा येथे आता पट्टेदार वाघाची दहशत

1110

बस स्टँड चौकातून कोवले बंधू रंगमंचाकडे वाघाची भ्रमंती

सिंदेवाही : ताडोबा बफर झोनमध्ये मध्ये वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा येथे मागील आठ दिवसापासून बिबट्याची प्रचंड दहशत सुरू असताना आता या पट्टेदार वाघाची दहशत सुरू झाली असून सोमवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास बस स्टँड चौकात वाघाची आरडाओरड सुरू असल्याने अनेक नागरिकांना जाग झाली. तेव्हा पट्टेदार वाघ हा बस स्टँड चौकातून कोवले बंधू रंगमंचाकडे भ्रमंती करीत असल्याचे अनेकांनी प्रत्यक्ष पाहिले असल्याने नागरिकांमध्ये वाघाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

.      शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत वासेरा येथे मागील आठ दिवसापासून बिबट्याचा गावात प्रचंड धुमाकुळ सुरू असून आता पर्यंत बिबट्याने अनेकांच्या कोंबड्या, बकऱ्याना फस्त केले आहे. वनविभागाकडून केवळ फटाके फोडण्याचे काम करण्यात आले असून कोणतेही ट्रॅप कॅमेरे किंवा लाईव्ह कॅमेरे न लावता बिबट्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. असे असताना सोमवारी रात्री २.३० वाजता एक पट्टेदार वाघ बस स्टँड चौकातून गावाकडे भ्रमंती करीत असल्याचे अनेकांनी बघितले आहे. पट्टेदार वाघाने वासेरा येथील गावशेजारी भ्रमंती केले असल्याचे वाघाच्या पाऊलखुणा वरून स्पष्ट दिसून येत आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळविले असून त्यांनी तात्काळ सदर वाघाचा बंदोबस्त करावा. अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. सध्या उन्हाळी धानाची लागवड केली असून शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतावर जावे लागत आहे. मात्र वाघाची प्रचंड दहशत सुरू असल्याने शेतकरी शेतावर जाणे टाळत आहेत. परिणामी शेतातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे वनविभागाने सदर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!