5 मार्च रोजी होणार विशेष सभा
12 संचालकाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
12 संचालक अज्ञातस्थळी
वरोरा
. 18 संचालक असलेल्या वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्यावर 12 संचालकांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला यावर 5 मार्च रोजी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिले आहे. 18 पैकी 12 संचालक अज्ञातस्थळी रवाना झाले आहे.
.. सभापती डॉक्टर विजय देवतळे हे संचालकांना विश्वासात घेत नाही आणि काही मर्जीतील लोकांनाच घेऊन कामकाज करतात. समितीच्या नियमानुसार उप समित्यांचा कालावधी एक वर्षाचा असताना कालावधी संपून सुद्धा उपसमिती नवीन गठीत केली नाही व कोणताही ठराव घेतला नाही पूर्वीची उपसमिती कार्यरत आहे बाजार समितीच्या नियमानुसार बाजार समितीचे दैनंदिन कामकाज चालत नाही सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्या कार्यकाळात झालेल्या नियमबाह्य कामे आर्थिक घोटाळा त्यावरील चौकशी कायद्यानुसार केली नाही. बैल बाजार, नाफेड खरेदी च्या माध्यमातून काही लोकांना घेऊन वसुली केल्या जात असल्याचा आरोप ही होत आहे. संचालक मंडळाने अनेक बाबी सभापती देवतळे यांच्या लक्षात आणून दिल्या नंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप 12 संचालकांनी डॉक्टर विजय देवतळे यांच्यावर करीत त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
12 संचालक अज्ञातस्थळी
सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्यावर 12 संचालकांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर 12 संचालक अज्ञात स्थळी रवाना झाले. अविश्वास प्रस्ताव पारित करण्याकरिता 12 संचालकाची आवश्यकता आहे ते विरोधकांनी साधले हे विशेष


