Home चंद्रपुर जिल्हा विशेष तुझे कुटूंब उध्वस्त होईल ! पूजा करावीच लागेल

तुझे कुटूंब उध्वस्त होईल ! पूजा करावीच लागेल

1094

भविष्यवाणी करीत 7 लाख रुपयांनी फसविले

तब्बल एका वर्षानंतर आरोपींना पकडण्यात चिमूर पोलिसांना यश

नेरी : भविष्य सांगत गावात फिरत असलेला भोंदू बाबा एका घराजवळ थांबला आणि तुझे कुटुंब उध्वस्त होईल तुला पूजा करावीच लागेल असे सांगत भविष्यवाणी केली. दरम्यान घाबरलेल्या त्या इसमांकडून चक्क 7 लाख 51 हजार रुपयांनी फसविण्याचा प्रकार चिमूर तालुक्यातील नेरी जवळील वाघेडा येथे घडली होती. या प्रकरणातील आरोपींना तब्बल एक वर्षा नंतर दि. 18 फ्रेबु 2025 ला चंद्रपूर येथे चार भोंदू भामट्यांना पकडण्यात चिमूर पोलिसांना यश आले.

.    मागील वर्षी चार ते पाच भोंदू भामटे चिमूर तालुक्यात भोंदूगिरी भविष्यवाणी करण्यासाठी फिरत होते. भविष्य सांगून लोकांना उल्लू बनवून पूजा करण्याच्या नावाखाली पैशाची लूटमार करीत होते. अश्यातच तालुक्यातील वाघेडा या गावात जाऊन जोस्ना अनिल मेश्राम या महिलेच्या घरी गेले आणि भविष्य वांनी सांगितले की तुझ्या कुटुंबावर संकट आले आहे. यात तुझे कुटूंब उद्धवस्त होणार आहे. यामध्ये तुझा मुलगा तुझी मुलगी मरणात आहे. असे खोटे सांगून भोंदू च्या वेशात असणाऱ्या भामट्यांनी सदर महिलेला पूजापाठ करण्याच्या नावाखाली सात लाख एक्यानवं हजार सहाशे रुपयांनी गडविले आणि पस्तर इखले. मात्र भोंदू पूजेसाठी आलेच नसल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच पोलिसात त्या अज्ञात भोंदू विरुद्ध तक्रार दाखल केली. आणि पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली. मात्र आरोपी तब्बल एक वर्षानंतर नागभीड येथील गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांच्या जाळ्यात चंद्रपूर येथे सापडले. सदर चार आरोपी हे नागभीड गुन्हाच्या तपासात पकडण्यात आले. मात्र पोलिसांच्या खाकीचा बाजीराव या प्रताप दाखविताच चार आरोपी पैकी एकाने सदर वाघेडा येथील लूटमार प्रकरणाचा गुन्हा कबुल केला आणि इतर आरोपीची नावे सांगितल्याची माहिती पुढे आली आहे इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी कळविले आहे.

.    सदर कारवाई चिमूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष बाफल यांच्या मार्गदर्शनाखाली नूकतेच रुजू झालेले दबंग ए. पी. आय. मल्हारी ताळीकोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्यांच्या या कारवाईने सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आणि इतर आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!