महापुरुषांबाबत अभद्र वक्तव्य
राहुल सोलापूरकरचा पुतळा दहन
नागभीड : छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल राहुल सोलापूरकर या इसमाने अभद्र टिप्पणी केल्याबद्दल त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळून नागभीड येथे निषेध करण्यात आला.
. मागील आठवड्यात राहुल सोलापूरकर या व्यक्तीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभद्र वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेचा घोर अपमान झालेला आहे. महाराष्ट्रातील जनता हे दोन्ही महापुरुष यांना देवाप्रमाणे पूजते आहे. राहुल सोलापूरकर नावाचा विकृत मानसिकतेच्या पिलावळीना वेळीच ठेचले पाहिजे म्हणून नागभीड शिवसेना तालुका प्रमुख मनोज लडके यांचे नेतृत्वात आणि युवासेना उपजिल्हा प्रमुख सुधीर राजगडकर व शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत पिसे यांचे प्रमुख उपस्थितीत राहुल सोलापूरकर याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन राम मंदिर चौक नागभीड येथे करून त्याचा निषेध करण्यात आला.
. या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख स्वप्नील मेश्राम, महिला आघाडी तालुका प्रमुख संगीता फटिंग, महिला आघाडी शहर प्रमुख माया मोरांडे, युवासेना तालुका प्रमुख नितेश शेंडे, शरद सहारे, विनोद लांजेवार, चंदन खापर्डे, नितीन नैताम, सुनील मेश्राम, किरमिरे, भाग्यश्री लांजेवार, अनुसया लांजेवार, सर्जन देशमुख, बबन व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


