कोळसा कामगाराच्या हिताचे अनेक ठराव मंजूर करणार
कुचना : भारतीय मजदुर संघाचे उद्योगिक युनिट असलेल्या अखिल भारतीय मजदुर संघाचे १९ वे त्रैवार्षिक अधिवेशन १२ व १३ फेब्रुवारी ला रेशिमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृती भवन नागपूर येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनात कोळसा कामगाराच्या हिताचे अनेक ठराव मंजूर होणार आहे.
. या अधिवेशनाला भारत सरकारचे कोळसा व खदान मंत्री जी. किशन रेड्डी हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे भारतीय मजदुर संघाचे उप महामंत्री सुरेंद्र कुमार पांडे व प्रभारी लक्ष्मा रेड्डी यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप होईल.
. यावेळी देशभरातील भारतीय मजदुर संघाच्या नोंदणीकृत संघटनाचे ८०० अधिकारी व कर्मचारी या अधिवेशनात सहभागी होणार आहे. या अधिवेशनात कामगारांच्या कल्याण व सुरक्षा या विषयावर प्रामुख्याने चर्चा होईल. तसेच कोळसा खाणीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या हिताचे ठराव घेण्यात येईल. चांगल्या वैद्यकीय सुविधा, सीएमपीएफ पेन्शन मध्ये सुधारणा, प्रदूषण पर्यावरण या मुद्यावरही गंभीरतेने चर्चा करण्यात येईल. या अधिवेशनात नागपूर शहरातून रॅली काढन्यात येईल यात कोळसा क्षेत्रातील विविध प्रतिनिधी सहभागी होईल. यातून राष्ट्रीय एकात्मतेची झलक दिसून येईल. अशी माहिती भारतीय कोळसा खदान मजदुर संघ वणी माजरी क्षेत्राचे महामंत्री जगन्नाथ जेनेकर यांनी माहिती दिली.


