प्रियदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भद्रावती येथे आयोजन
भद्रावती : ग्रामीण विकास प्रशिक्षण प्रसारक मंडळ भद्रावती द्वारा संचालित प्रियदर्शनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथे दिनांक 12 ते 14 फेब्रुवारी 2025 ला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
. या आयोजनाचे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ला जिल्हास्तरीय शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन क्रीडा (क्रिकेट हॉलीबॉल कबड्डी) स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. येथे होत असणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शासकीय व अशासकीय आयटीआय तसेच विद्यालय एकूण 16 संघाने सहभाग दर्शविलेला आहे. हा कार्यक्रम ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ भद्रावती अध्यक्ष धनंजय गुंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
. या उद्घाटन समारंभास संस्थेचे प्राचार्य पी व्ही बाळसराफ, डॉ. प्रा. यशवंत घुमे, प्रफुल चटकी, धर्मेंद्र हवेलीकर, लांजेवार, पिंपळकर, सोनाली गुंडावार, रुपाली चिंतलवार तसेच प्रियदर्शनी आयटीआय सर्व कर्मचारी वर्ग व प्रशिक्षणार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.


