प्रियदर्शनी कान्वेंटचा सांस्कृतिक महोत्सव
पाल्यांच्या कलाविष्काराने पालक सुखावले
बल्लारपूर : आपल्या संविधान लागू झाल्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे.यामुळे संविधानाचा जागर केला जात आहे. या अनुषंगाने प्रियदर्शनी कान्वेंटच्या चिमुकल्यांनी नृत्यविष्काराने संविधानाचे महत्व अधोरेखित केले. यावेळी पाल्यांच्या कलाविष्काराने पालक देखील सुखावले. दरम्यान चिमुकल्यांनी नृत्यविष्कारातून रसिकांना चांगलेच रिझवले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील प्रियदर्शनी कान्वेंटचा सांस्कृतिक महोत्सव स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक मंचावर साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांनी भारतीय संविधान, विविध राज्यातील लोकसंस्कृतीचा अविष्कार नृत्यातून सादर केला. गोंडी नृत्य, राजस्थानी नृत्य, चित्रपट संगीत आदी गीतावर नृत्यविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. देशभक्ती गितावर व लावणी नृत्यावर चिमुकले चांगलेच थिरकले.
. सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन प्रा. डॉ.श्यामकुमार डहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराव चनेकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, अनंतधुम्रकेतू वानखेडे, प्रशांत गिरडकर, प्राचार्य रंजना येलमुले,स्वाती टोंगे, आनंदा कांबळे यांची उपस्थिती होती.


