Home चंद्रपुर जिल्हा विशेष रेती तस्करांची तलाठ्याला धक्काबुक्की

रेती तस्करांची तलाठ्याला धक्काबुक्की

1102

रेती तस्कराची मुजोरी वाढली

पटवारी संघटनेची शेगाव पोलिसात तक्रार

भद्रावती : अवैधरित्या रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला तलाठ्याने थांबविले. परवाना विचारला. अचानक दोन जण दुचाकीने आले आणि तलाठ्याला धक्काबुक्की करत ट्रॅक्टर पळविल्याचा प्रकार गुरुवारी दिनांक 30 जानेवारीला सकाळी 9.30 वाजता भद्रावती तालुक्यातील कारेगाव गावाजवळ घडली. या प्रकाराची पटवारी संघटनेने शेगाव पोलिसात तक्रार दाखल करीत आरोपी रेती तस्करावर कारवाई करण्याची मागणी केली.

.     वरोरा भद्रावती तालुक्यात अवैद्य रेती व्यवसाय करणाऱ्याला रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहे. दिवसा अधिकारी पकडतात म्हणून रात्री पासून ते पहाटे पर्यंत रेतीची तस्करी करीत आहे. या तस्करांना स्वतःला प्रतिष्ठित समजणारा मोरक्या आणि काही भ्रष्ट अधिकारी यांना सहकार्य करीत असून चुकीने वाहन पकडले तर अधिकाऱ्यांशी सेटिंग करून देण्यासाठी सुद्धा हा मोरक्या समोर जात असल्याने वरोरा भद्रावती तालुक्यात अवैध रेती तस्करांचे जाळे चांगलेच फोफावले आहे..
या रेती तस्करांवर अंकुश लावण्यासाठी महसूल प्रशासन आता सज्ज झाला आहे. भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर सध्या रेती तस्करा विरोधात ॲक्शन मोडवर आहे. गौण खनिज विरोधात पथक तयार करून तलाठी व मंडळ अधिकारी यांचा यात समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी दिनांक 30 जानेवारीला सकाळी 9.30 वाजता पटवारी अनंत गीते यांना अवैद्य रेतीचे ट्रॅक्टर वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहितीच्या आधारे पटवारी अनंत गीते यांनी आपले सहाय्यक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे यांच्या सहाय्याने कारेगाव गावाजवळ रेतीने भरलेले ट्रॅक्टर अडवून विचारपूस करून परवाना मागितला. परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले.

.      मात्र दोन अज्ञात व्यक्तींनी पटवारी गीते यांना धक्काबुक्की करून रेतीने भरलेले ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. याची माहिती प्रथम भद्रावती येथील तहसीलदारांना देण्यात आली व नंतर शेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात धक्काबुक्की करणाऱ्या इसमांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व पुढे अशा घटना घडू नये यासाठी उपाय करावे अशी मागणी पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजुरकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!