विविध कार्यक्रमाचे आयोजन
भद्रावती : तालुक्यातील घोडपेठ येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन दिनांक 22 व 23 जानेवारीला घोडपेठ येथील किसान भवन जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर करण्यात आले असून यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
. दिनांक 22 ला सकाळी पाच वाजता घटस्थापना व ध्यान पाठ, चिंतन, योग व मार्गदर्शन, ग्रामसफाई मान्यवरांचे भजन दुपारी एक वाजता रांगोळी स्पर्धा व महिला मेळावा प्रबोधन अल्कोहोलिक्स अंनानिमस ‘मघप्राशन’ एक आजार या विषयावर ऊर्जा ग्राम येथील मारोती साव यांचे मार्गदर्शन, दुपारी 2.30 वाजता सत्कार सोहळा यात प्रमुख पाहुणे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकारचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, निर्भय कटारिया, भास्कर ताजने, मंगेश भोयर, रमेश राजुरकर, आकाश वानखेडे उपस्थित राहणार असून घोडपेठ सरपंच अनिल खडके, यशवंत वाघ, वैशाली उरकुडे, विमल निमकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी 6 ते 7वाजता सामुदायिक प्रार्थना व चिंतन सायंकाळी 8.30 वाजता गुरुकुंज आश्रम मोझरीचे ह. भ. प. लक्ष्मण काळे महाराज यांचे जाहीर कीर्तनाचे सादरीकरण होणार आहे.
. दिनांक 23 ला पाच वाजता ध्यान पाठ व चिंतन, रामधृन दिडी व परिसर सजावट स्पर्धा, सकाळी दहा वाजता रामधून या विषयावर सेवक राम मिलमिले यांचे मार्गदर्शन, सकाळी 10.30 वाजता पाहुण्यांचे आगमन व स्वागत सोहळा या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खासदार प्रतिभा धानोरकर, नेत्रतज्ञ डॉ. चेतन खृटेमाटे, दिनेश चोखारे, ज्योती मोरे, देवानंद शंकावार, विनोद घृगृल, महेश माटे, अशोक येरगुडे, ईश्वर निखाङे उपस्थित राहणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता गोपाल काला व किर्तन ह. भ. प. आशिष महाराज माणूसमारे व संच पाचगाव हे सादरीकरण करणार आहे.
. उपरोक्त कार्यक्रमाला ग्राम वर्षांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष चोकोबा मोहितकर, रमेश उरकुडे, शंकर खाडे, विजय मासरकर, विवेक राऊत, मिनदेव खिरटकर, संदीप खाडे, संजय घृगृल, संध्या नागपुरे, चंद्रकला मंगला परचाके, बेबी वाटेकर आदींनी केले आहे.


