माजी पंचायत समिती सदस्या भावना बावनकर यांचा वाढदिवस
नेरी : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ जिल्हाध्यक्षा तथा माजी पंचायत समिती सदस्या भावना संजयराव बावनकर यांचा वाढदिवस राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय वडाळा, चिमूर येथे मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला.
. या कार्यक्रमाकरिता राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्याम लेडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून करण्यात आली. या कार्यक्रमात भावना बावनकर यांनी विद्यार्थी तथा उपस्थित सर्व मान्यवरांना केक व नाश्ता दिला तसेच विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मूकबधिर विद्यार्थी आनंदित आणि खूप उत्साहीत झाले होते.
. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर पिसे, ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष रामदास कामडी, ओबिसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते, ओबीसी महिला महासंघाच्या तालुका अध्यक्षा यामिनी कामडी, ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुका अध्यक्ष कवडू लोहकरे सर्व राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथील मूकबधिर विद्यार्थी तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते.


