Home सामाजिक गणराज्य दिनापासून भद्रावतीतीत रोटरी उत्सव

गणराज्य दिनापासून भद्रावतीतीत रोटरी उत्सव

1146

भद्रावती : विविध सामाजिक उपक्रमासाठी प्रख्यात असलेल्या रोटरी क्लब भद्रावती तर्फे यावर्षी गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर रोटरी उत्सव मेल्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे ऑडिशन स्वागत सेलिब्रेशन हाॅल मध्ये मागच्या महिन्यात घेण्यात आले आहे.

.     दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रोटरी उत्सव मेला तालुका क्रीडा संकुल भद्रावतीच्या भव्य प्रांगणात दिनांक २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान आयोजित केलेला आहे. आठ दिवस होणाऱ्या या रोटरी उत्सव मेल्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिक, प्रेक्षकांसाठी आयोजित केलेली आहे.

.     या रोटरी उत्सव मेल्यात विविध वयोगटात सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्यात फॅन्सी ड्रेस स्पर्धा, एकल न्यृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, एकल गीत गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केलेले असून प्रथम व द्वितीय क्रमांकाला प्रत्येक स्पर्धा व प्रत्येक गटासाठी आकर्षक असे बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत. रोटरी उत्सवाचा आकर्षक व प्रसिद्ध असा फटाका शो शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे .२६ जाने. २०२५ तारखेला मान्यवर खासदार महोदय व आमदार महोदय, मान्यवर यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे .

.      सोबतच मनोरंजनासाठी विविध झुलांचा पार्क, खाण्याच्या विविध पदार्थांचे स्टाल तसेच विविध आकर्षक वस्तूंच्या दुकानांची रेलचेल या उत्सव मेल्यात राहणार आहे. तेव्हा भद्रावती परिसरातील समस्त नागरिकांनी या रोटरी उत्सव मेल्याचा आनंद घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर खंडाळकर, सचिव आत्माराम देशमुख, माजी अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद, अनिल धानोरकर, सुनिल पोटदुखे, विनोद कामडी, सुधीर पारधी, प्रवीण महाजन, अब्बास अजानी, प्रो.से. विक्रांत बिसेन, कोषाध्यक्ष हनुमान घोटेकर, डॉ ज्ञानेश हटवार, सुरेंद्र राउत, किशोर भोसकर, रूक्साना शेख, आनंद क्षीरसागर, तसेच समस्त रोटरी सदस्य भद्रावती यांनी केले आहे.

error: Content is protected !!