Home सामाजिक संविधान हे बहुजनांसाठी बाबासाहेबांनी दिलेली देणगी आहे – अँड. डॉ. प्रा. सुरेश...

संविधान हे बहुजनांसाठी बाबासाहेबांनी दिलेली देणगी आहे – अँड. डॉ. प्रा. सुरेश माने

1134

नागभीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशांतील शेषीत, पिडित, बहुजनांसाठी अत्यंत महत्वाची जी देणगी दिली ते भारतीय संविधान आहे. ज्यामुळे समाजांत मानुस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला तो फक्त संविधानाच्या माध्यमातुन मिळाला आहे. भारताचे संविधान स्वतंत्र, समता, बंधुता या त्रिसुत्रावर आधारित असुन संविधान अबाधित राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. तेव्हा डॉ.बाबासाहेबाच्या या संविधान रुपी देनगीचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे असे आवाहन संविधान तज्ञ डॉ.सुरेश मांने यांनी केले.

.     फुले-शाहू-आबेडकर विचारमंच तळोधी परिसर यांचे वतिने आयोजीत “संविधान सन्मान परिषद” या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुरडकर यांनी सांगितले की जातीव्यवस्थेने नाकारलेले हक्क व अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातुन नागरिकांना दिले. आणि म्हणून बाबासाहेब हे शोषीत पिडित बहुजानाचे कैवारी असल्याचे मार्मिक विचार यावेळी व्यक्त केले.

.     तळोधी परिसरातील बेचाळीस गावांतून यानिमित्ताने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करुन संविधान जागर करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजातील उच्च शिक्षित मुलींचा डॉ. सुरेश माने यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचारमंचचे अध्यक्ष विनोद लांडगे यांनी केले. तर संचालन सचिव पि.के. जनबंधू, तर उपस्थितांचे आभार प्रा. विलास वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डि.एन.शेन्डे, मंगेश फुलझेले, गंजू मेश्राम, यादव रामटेके, संदेज सोरते, राहुल रामटेके, आनंद शेंडे, अक्षय मेश्राम, नंदकिशोर रामटेके, मनिष शेंडे, राजेश शेंडे, हिराचंद बारसागडे, पुनाराम निकुरे, सुनिल रामटेके, आनंद सोनटक्के, आदी सर्व फुलें शाहु आंबेडकर विचार मंचचे पदाधिकाऱ्यांनी अधक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला तळोधी परिसरातील बहुसंख्य महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!