शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षक आमदार निवडणूकित मतदानाचा अधिकार द्या
५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न
नेरी : कोणतेही अधिवेशन म्हणजे लढाईचे प्रशिक्षण आहे. आणि प्रत्येक सदस्यांनी अश्या लढाईत भाग घ्यावा लागतो तसेच शिक्षण विभागात कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याकरिता शिक्षक आमदार हा महत्त्वाचा घटक ठरतो. त्या शिक्षक आमदाराच्या निवडणुकीत शिक्षकेतरी कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी चिमूर येथे आयोजित ५२ व्या राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीभूमी चिमूर येथे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.
. या अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागाचे पदवीधर आमदार अभिजीत वंजारी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेचे महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, उपाध्यक्ष रवींद्र गवळी, प्रिया पवार खैरुद्दीन सय्यद, श्रीधर गोंधळी, मुंबई विभागाचे कार्यवाह देविदास पांगुळे, पुणे विभाग डॉ गोवर्धन पांगुळे, नाशिक विभाग डी.पी महाले, गजानन नानचे, संजय कावळे, राजेश्वर चापुले, डॉ. विजय ताले, जिवनदास सार्वे, श्रीकांत पावणे, सुखदेव कंद, भाऊसाहेब थोटे, गोपाळजी केडेकर, प्रशांत हजारे उपस्थित होते.
. या अधिवेशनात शिक्षकेतर पदोन्नती पदभरती, अनुकंप, वेतन निश्चिती तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी विविध ठराव घेऊन त्या समस्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने देण्यात आली. चंद्रशिल्प या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
. या अधिवेशनाचे आयोजन समीतीत चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर वासेकर, कार्याध्यक्ष गणेश गेडाम, सचिव प्रशांत हजारे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण गोरे, राजेंद्र खांडेकर, रोहिणी जोशी, शिला मेश्राम, सहसचिव सुभाष गेडाम, कार्याध्यक्ष अनंता चौधरी यांचा समावेश होता. अधिवेशनाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांनी केले, संचालन अँड योगेंद्र सातपुते व इमरान मुल्ला यांनी केले तर उपस्थित त्याचे आभार श्रीकांत चाफले यांनी मानले. या अधिवेशना करिता राज्यातील 36 जिल्ह्यातून हजारो शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


