Home सामाजिक खातेदाराच्या मृत्यूपश्चात वारसांना २ लाखांची दिली मदत

खातेदाराच्या मृत्यूपश्चात वारसांना २ लाखांची दिली मदत

1153

सिंदेवाही : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा सिंदेवाही च्या वतीने बँकेतील काही खातेदाराकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी झाले असून तसेच या योजनेतील सिंदेवाही तालुक्यातील कारगाटा गावातील वामन नारायण सिड्डाम यांनी 436 रुपये तीन वर्ष भरले व अचानक त्यांच्या मृत्यू झाल्यामुळे बँकेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मृतक खातेदाराच्या कुटुंबीय त्यांच्या वारसदार असलेल्या ज्योती वामन सिड्डाम यांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

.     प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची मदत देताना विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा सिंदेवाही चे ब्रांच मॅनेजर विवेक सिड्डाम, सहाय्यक मॅनेजर अनिकेत मेश्राम व बँक ऑफिस असिस्टंट प्रणय मामीडवार हे उपस्थित होते.

.      विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा- सिंदेवाही मॅनेजर विवेक सिड्डाम यांनी सांगितले की, विदर्भ कोकण बँक शाखा- सिंदेवाही च्या वतीने बँकेतील काही खातेदारानी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काढला असुन या योजनेसाठी, खातेधारक ग्राहकांनी वार्षिक फक्त ४३६ रुपये प्रीमियम भरला असुन कोणत्याही कारणामुळे खातेधारक ग्राहकांचा मृत्यू झाल्यास 2 लाखाचा जीवन विमा संरक्षण प्रदान करते. याचा कालावधी १ वर्षाचा आहे. दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करता येते.

error: Content is protected !!