चंद्रपुर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत चंद्रपुर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सह आदी महिलांनी एका कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला.
. विधानपरिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या आदेशाने चंद्रपूर संपर्क प्रमुख राय व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात मनसेच्या माजी नगरसेविका सीमा रामेडवार सह नेहरू शामुगवेल व मोनित येरावार यांनी एका कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
. यावेळी महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर, महानगर प्रमुख भरत गुप्ता, वैद्यकीय जिल्हाप्रमुख अश्विन उईके, बल्लारपुर तालुका प्रमुख पंकज वडडेट्टीवार, महिला उपजिल्हाप्रमुख माया मेश्राम, शहर प्रमुख वाणी सदालावर, उपशहर प्रमुख अंजु लेंगुरे, उपशहर प्रमुख शैलेश सदालावार,नयन जंगम,तेजस गाणार,राजू एटलावार व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


