दोन गंभीर
गोंदेडा नदी पुलाजवळील घटना
नेरी : चिमुर तालुक्यातील गोंदेडा नदी पुलाजवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार व मागे बसलेला युवक दोघेही गंभीर जखमी झाले असून एकाला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
. नागभीड तालुक्यातील धामणगाव चक्र येथे जात असलेल्या ट्रक क्र एम एच ०४ जे के ७५४२ ने गोंदेडा समोर नदीच्या पुढे दुचाकी ने वडसी येथील मयतीच्या कार्यक्रमाला येत असताना ट्रक ने दुचाकी धडक दिली. यात दुचाकीस्वार सूरज मनसाराम मेश्राम (२६) व मागे बसलेला रोशन मेश्राम (14) हे दोन्ही गंभीर जखमी झाले. या अपघातात एकाचा पाय तुटला तर एकाला डोक्याला गंभीर जखम झाली असून प्राथमिक उपचार चिमूर येथे करून पुढील उपचारासाठी नागपूर ला हलविण्यात आले आहे.
. सदर ट्रक चे चालक प्रज्वल भक्तदास मेश्राम यांनी अपघात होताच ट्रॅक सहित धूम ठोकली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगेश धाडसे यांनी ट्रक चा पाठलाग केला. तसेच समोरच्या गावाला फोन वरून माहिती दिली असता ट्रकने मोटेगाव काजलसर पार केले. तेव्हा बोथली येथील नागरिकांनी त्या ट्रकला अडविले. मात्र चालक पसार झाला आणि पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


