Home चंद्रपुर जिल्हा विशेष नागभीड तहसील कार्यालयावर भीमसैनिकांचा जन आक्रोश मोर्चा

नागभीड तहसील कार्यालयावर भीमसैनिकांचा जन आक्रोश मोर्चा

1186

नागभीड : नागभीड तालुक्यातील संविधानवादी भीमसैनिकांचा दिनांक 10 जानेवारी 2025 ला नागभीड तहसील कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.

.       पुरोगामी महाराष्ट्रात दिवसेंदिवस बौध्द समाज, अनुसूचित जाती वंचित समूह व ओबीसी समाजाच्या अस्मितेला धक्का पोहचेल, असे कृत्य जाणीवपूर्वक केल्या जात आहेत. याचे कारण भारतीय संविधानामुळे हा समाज स्वाभिमानाने जीवन जगायला लागला असून यांची थोडी फार प्रगती झालेली दिसत आहे आणी ते केवळ भारतीय संविधानामुळे शक्य झाले आहे. म्हणून भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली राज्यक्रांती, सामाजिक क्रांती, व धम्मक्रांती कशी दडपून टाकता येईल असा मनुवादी सतत प्रयत्न करत असतात.

.       या पूर्वी सुद्धा मनुवादी देशद्रोह्यानी संविधानाची प्रत जाळली. या सरकारमधील अनेक मोठे नेते व इतर पक्षातील काही मनुवादी लोक संविधान बदलून मनुवादी विचारसरणीचे संविधान निर्माण करण्याची भाषा बोलत आहेत. त्याच मनुवादी कुटील नितीचा एक भाग म्हणून दिनांक 10 डिसेंबर 2024 ला परभणी येथें सोपान पवार नावाच्या देशद्रो्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना केली. तसेच या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेत संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा कृतशीत बुद्धीने उपहास करून अपमान केला.

.      भारताचे संविधान हे सर्व भारतीय स्त्री – पुरुषांच्या कल्यानाचा जाहीरनामा आहे. त्याचे रक्षण व सन्मान करणे आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. म्हणून आपआपसातील मतभेद, गटतट, पक्ष, संघटना राजकीय, सामाजिक हेवेदावे बाजूला सारून संविधानाच्या सन्मानासाठी व रक्षणासाठी जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन नागभीड तालुक्यातील संविधानवादी भीम सैनिकांनी केले आहे.

error: Content is protected !!