Home सामाजिक सुशासन सप्ताह नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी – नरेंद्र बैस

सुशासन सप्ताह नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी – नरेंद्र बैस

1189

“प्रशासन गाव की और” अंतर्गत लाठी येथे सुशासन सप्ताह शिबीर

चंद्रपूर : महसूल प्रशासन जनतेच्या हितासाठी कार्यरत आहे. गावागावात सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान केंद व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना नागरिकांच्या फायद्याच्या आहे. याचा उपयोग जनतेला व्हावा, हा उद्देश आहे. सुशासन सप्ताह नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आहे, असे प्रतिपादन मंडळ अधिकारी नरेंद्र बैस यांनी लाठी येथे आयोजित सुशासन सप्ताह शिबिरा दरम्यान व्यक्त केले.

.       तहसील कार्यालय गोंडपिपरी च्या वतीने “प्रशासन गाव की और” अंतर्गत लाठी येथे शिबीर पार पडले. यावेळी शिबीरात उपस्थित नागरिकांना विविध दाखल्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

error: Content is protected !!