Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैधरित्या साठवणूक केलेला ७६ ब्रास रेती साठा जप्त

अवैधरित्या साठवणूक केलेला ७६ ब्रास रेती साठा जप्त

1199

तहसीलदार संदीप पानमंद यांची धडक कारवाई

महसूल विभागाच्या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले

सिंदेवाही : सिंदेवाही तालुका रेतीसाठी प्रसिद्ध असून रेती तस्करांसाठी मोकळे रान असल्याने अनेक रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करीत असून नुकतेच मौजा पेटगाव येथील शेत शिवारात रेती तस्करांनी अवैध रेतीसाठा केला असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने सुमारे ७६ ब्रास एवढा रेतीसाठा जप्त केला असल्याने तालुक्यात तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

.      सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांना पेटगाव शेत शिवारात अवैध्य रेतीसाठा असल्याची माहिती प्राप्त होताच महसूल अधिकारी – कर्मचारी या पथकास सोबत घेऊन पेटगाव येथे चौकशी केली असता येथील एका खाजगी मालकीच्या शेतात रेती तस्करांनी अवैधरित्या उत्खनन करून रेतीचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे महसूल विभागाकडून तहसीलदार संदीप पानमंद यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास केले असता, ६५ ब्रास रेतीसाठा आढळून आला. त्यानंतर पेटगाव येथील एका शासकीय गटावर तस्करांनी ११ ब्रास अवैध रेतीचा साठा केल्याचे पथकाला आढळून आले, त्यामुळे एकूण ७६ ब्रास अवैध रेतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्तीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

.       सदर कारवाई तहसीलदार संदीप पानमंद, नायब तहसीलदार मंगेश तुमराम, मंडळ अधिकारी अंबादास गेडाम, तलाठी सुनील गुंजाळ, कोतवाल तुलसीदास गेडाम, आकाश श्रीरामे, सचिन सिडाम यांनी केली. जप्त करण्यात आलेली रेती शासन निर्णयानुसार तालुक्यातील पेटगाव येथील घरकुलधारकांना मोफत वाटप केली जाणार असल्याचे सिंदेवाही तहसीलदार पानमंद यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!