Home चंद्रपुर जिल्हा विशेष शहीद जवानावर शासकीय इतमात आज होणार अंतिम संस्कार

शहीद जवानावर शासकीय इतमात आज होणार अंतिम संस्कार

1225

जवानांचे वाहन खोल दरीत पडल्याने झाला अपघात

वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील जवानाचा समावेश

वरोरा : जम्मू काश्मीर मध्ये मराठा अकरा बटालियन मध्ये कार्यरत जवानांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला. या वाहनांमध्ये जवळपास १८ जवान असून पाच जवान शहिद झाल्याची माहिती आहे. यात वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील अक्षय दिगंबर निखुरे हा जवान शहीद झाला.

.     वरोरा तालुक्यातील पिंपळगाव या छोट्याशा खेड्यातील अक्षय निखुरे व त्यांचा भाऊ दोघेही भारतीय सैन्यामध्ये सेवा करतात. अक्षय निखूरे हे जम्मू काश्मीर मध्ये मराठा अकरा बटालियन मध्ये कर्तव्यावर असताना जवानांन सोबत वाहना मध्ये होते. त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला. या वाहनांमध्ये जवळपास १८ जवान असून पाच जवान शहिद झाले. याबाबत रजेवर वर्धा येथील आलेल्या जवानांनी घरी येऊन निखुरे कुटुंबाला सदर माहिती दिली.

जम्मू काश्मीर मध्ये मराठा अकरा बटालियन मध्ये कार्यरत                                                                                                                 अक्षय दिगंबर निखुरे यांनी संत तुकडोजी महाविद्यालय येथे बारावी पर्यंत शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर वरोरा येथे बीए फायनल शिक्षण घेत असतानाच भारतीय सैन्य दलात वयाच्या २१ व्या वर्षी सन २०१८ मध्ये रुजू झाले होते. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून वडील आणि आई दोघेही घरची चार एकर शेती करतात. अक्षय कर्तव्यावर असताना अपघातात शहीद झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज घरची परिस्थिती हलाखीची असताना आपले दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात पाठवणाऱ्या या वडिलांचे कौतुक परिसरातील लोकांनी केले होते. परंतु दुर्दैवाने त्याचे निधन झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. घरी आई-वडील आणि भारतीय सैन्य दलात असलेला एक भाऊ असा परिवार असून शहिद जवानांचे गुरुवारी दि. 26 रोजी सकाळी 10.30 वाजता स्वगावी शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!