विलम येथील ग्रामपंचायतचा अफलातून प्रकार
नागभीड : तालुक्यातील विलम येथें 25/15 योजने अंतर्गत समाजभवनाचे बांधकाम सुरु आहे. अपूर्ण बांधकाम असलेल्या सार्वजनिक समाज भवनाची ताबा पावती मिळण्यापूर्वी मालमत्ता क्रमांक 446/1 च्या नमुना 8 वर चुकीच्या पद्धतीने नोंद घेतल्याने चौकशी करण्यात यावी अशी पत्रकार परिषदेतून नारायण मोरांडे यांनी मागणी केली आहे.
. विलम येथील नारायण मोरांडे यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितली. त्यात अनेक बाबी समोर आल्या आहेत. विलम येथील सार्वजनिक समाज भवन हे 25/15 योजने अंतर्गत घेण्यात आले. गावातील छोटे मोठे कार्यक्रम या समाज भवनातून घेतल्या जातील हा उद्देश ठेऊन आमदार बंटी भांगडिया यांनी ग्रामपंचायत विलमला निधी उपलब्ध करून दिला. बांधकाम सुरु असतानाच ग्रामपंचायत विलम यांनी खरा उद्देश डावलून त्या समाज भवनाला बँक ऑफ इंडिया ला किरायाने देण्यासंबधी ठराव घेऊन बँक ऑफ इंडिया च्या विभागीय कार्यालयाला तशी निविदा सादर केली. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना कार्यक्रम करण्यासाठी जी अडचण पूर्वी होती तीच समस्या पूर्ववत ठेऊन आलेल्या निधीचा दुरपयोग केल्याने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.
. विषय क्रमांक 2 नुसार सार्वजनिक समाज भवनाचे बांधकाम अजूनही पूर्णतःवास आलेले नाही. बांधकाम अपूर्ण असतानाच ग्रामपंचायत कार्यालय विलम यांनी ठराव घेऊन त्या इमारतीचा ताबा मिळण्यापूर्वीच मालमत्ता क्रमांक 464/1 च्या नमुना 8 वर आर. सी. सी. पद्धतीचे 1500 चौरस फूट ची इमारत दाखवून नमुना 8 बनविलेला आहे. यामध्ये तर त्यांनी सर्व नियम मोडीत काढीत जनतेच्या नाहीतर शासनाच्या डोळ्यात सुध्दा धुळफेक केली. सर्व सामान्य जनतेच्या हिताची गळचेपी करीत ग्रामपंचायत कार्यालय विलम येथें सर्रास मनमानी कारभार करून सर्व नियमाची पायमल्ली करीत आहे. यामध्ये वरील एकही काम योग्य मार्गाने दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नारायण मोरांडे, पवन ठाकरे, उमेश बोरकुटे, रेवनाथ गुरफुडे, किशोर अजबले यांनी केली आहे.


