रस्त्याची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या दुर्लक्षपणाने अपघातात वाढ
कुचना : राष्ट्रीय महामार्ग वणी वरोरा अल्पावधीत तयार होऊन वाहतुकीस खुला करण्यात आला. टोल वसुली सुरु झाली. मात्र अपुऱ्या सुविधेमुळे कुचना सारख्या ठिकाणी वर्दळीच्या जागी सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे.
. या महामार्गचे कंत्राट एजीआयपीएल या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने रस्ता अल्पावधीत बनविला परंतु कुचना वस्ती, वेकोलि गेट,नागलोन या ठिकाणी रस्ते सुरक्षा साधनाचा अभाव दिसून येत असल्याने सामान्य टोल देणाऱ्या स्थानिक जनतेमध्ये रस्ता देखभाल करणाऱ्या कंपनीच्या मुजोरिविषयी कमालीची नाराजी दिसून येत आहे. कुचना गाव हे अगदी रस्त्यालगत असल्याने या ठिकाणी मोठ्या हॉलमाक्स लाईट ची गरज आहे परंतु या परिसरात कुठल्याही मोठ्या प्रकाश देणाऱ्या हॅलोजन लाईट ची व्यवस्था नाही अंधार पसरला असतो. याउलट जे ब्लींकर लाईट लावले होते ते बंद अवस्थेत आहे.रस्ता दुभाजकावर रिफ्लेक्टर ची गरज आहे,पायदळ जाणाऱ्या प्रवाशांसाठी कलरक्रॉसिंग ची गरज आहे परंतु तशी व्ययस्था कंपनीने केली नाही ,ट्रॅफिक सिम्बोल, सूचना फलक तसेच वर्दळीच्या ठिकाणी ब्रेकर यांची नितांत गरज दिसून येत आहे यासंदर्भात एनएचएआय यांनीही पत्रव्यवहार केला परंतु अजूनही यात सुधारणा नसल्याने या मार्गाची देखभाल करणाऱ्या कंपनिविषयी चिंता दिसून येत आहे.
. वणी वरोरा महामार्गावर टोल नाक्याजवळ ज्या पद्धतीची सुविधा दिली आहे ज्यात मोठ मोठी ब्रेकरची,होलमॅक्स हॅलोजन लाईटची व्यवस्था केली आहे त्याच पद्धतीची व्यवस्था कंपनीने कुचना वस्ती, वेकोली गेट, याठिकाणी हॅलोजन लाईट न लावणे म्हणजे रस्ता व्यवस्थापन करणारी कंपनी जनतेच्या सुरक्षेविषयी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा आरोप कुचना सरपंच सुचिता ताजने यांनी केला आहे.
देखभाल करणाऱ्या कंपनीने उपाययोजना करावी वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावर कुचना गावात मानवी वर्दळीच्या ठिकाणी ब्रेकर्स ची व्यवस्था करावी. कुचना वस्ती च्या ठिकाणी अपुरा प्रकाश असतो त्यासाठी मोठ्या हॅलोजन लाईट ची गरज आहे सोबतच स्पीड लिमिट बोर्ड नाही,कंपनीने लावलेले ब्लाइंकर्स लाईट बंद आहे. रिफलेक्टर्स ची गरज, रूम्बलर्स रेडियम ब्लॉक, पायदळ वाहतुकीसाठी क्रॉसिंग व्यवस्था, ट्रॅफिक सिम्बॉल या वाहतूक सुरक्षेची नितांत गरज असून यासंदर्भात एनएचएआय यांचेकडून पत्र दिले असून देखभाल करणाऱ्या कंपनीने यासंदर्भात उपाययोजना करावी. जेणेकरून जनतेचा प्रवास सुरक्षित होईल. अमितकुमार पांडेय, ठाणेदार, पोलीस स्टेशन माजरी


