पाच आरोपींना अटक
बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई
विसापूर : बल्लारपूर पोलिसांनी उल्लेखनिय कामगिरी बजावत तीन अग्नीशस्त्र आणि १८ जिवंत काडतूस जप्त करण्याची मोठी कारवाई केली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी विरुद्ध आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही मोठी कारवाई बल्लारपूर पोलिसांनी बुधवार (दि.४) डिसेंबर रोजी केली. या कारवाई मुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कंबरडे मोडले आहे.
. घटनेतील अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मुकेश उर्फ मुक्कु विश्वनाथ हलदर (२८), अमित दिलीप चक्रवती (34) दोन्ही रा. साईबाबा वॉर्ड बल्लारपूर, जितेंद्रसिंग उर्फ निक्कु गोविंदसिंग डिलोन (२९) रा. शिवनगर वार्ड, संघर्ष उर्फ गोलू बंडू रामटेके ( २७ ) रा. संतोषीमाता वार्ड व काश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी ( २0 ) रा.फुकटनगर बामणी ता. बल्लारपूर असे नाव आहे. सदर आरोपींच्या ताब्यातून तीन देशी बनावटीच्या पिस्तूल आणि तब्बल १८ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केला आहे. याची किंमत अंदाजे ९७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
. बल्लारपूर शहर मिनी भारत म्हणून ओळखले जाते. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात यावी म्हणून पोलीस विभाग सतर्कतेने कारवाई करत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे पाळेमुळे खोदून गुंडांना धडा शिकविण्याच्या अनुषंगाने मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने आज मोठी कारवाई बल्लारपूर पोलिसांनी केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी आर्म अॅक्ट च्या कलम 3/ 25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस.टोपले,उपनिरीक्षक हुसेन शाह,आनंद परचाके,सुनील कामटकर,पुरुषोत्तम चिकाटे, रणविजय ठाकूर,संतोष दंडेवार, संतोष पंडीत,सत्यवान कोटनाके,विकास जुमनाके,वशिष्ठ रंगारी,शेखर माथनकर,लखन चव्हाण, मिलींद आत्राम,खंडेराव माने,अनिता नायडू ,गजानन डोईफोडे,भूषण टोंग यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली.


