Home चंद्रपुर जिल्हा विशेष भद्रावती तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा

भद्रावती तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा

1297

आम आदमी पार्टी चे दारूबंदी विभागाला निवेदन

भद्रावती : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाला विविध गावांमधून प्राप्त होत होत्या. या समस्येमुळे ग्रामीण समाजामध्ये अनेक गंभीर परिणाम दिसून येत आहेत, जसे की तरुण पिढी व्यसनाधीन होणे, कौटुंबिक कलह, तसेच सामाजिक अस्थिरता वाढणे. या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उत्पादन शुल्क कार्यालय, वरोरा येथील निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

.       या निवेदनामध्ये तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भद्रावती तालुक्यातील अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी त्वरित छापे मारावेत. दारू विक्रीच्या बेकायदेशीर अड्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष पथक नेमावे. जर या मागण्या त्वरित पूर्ण केल्या नाहीत, तर आम आदमी पार्टी नागरिकांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देताना आम आदमी पार्टी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले, ओम पारखी, सुशांत दादा रायपूरे, लक्की निखाडे, राकेश कोवे, सौरव बेताल व इतर प्रमुख

error: Content is protected !!