सावली तालुक्यातील बोथली हिरापूर मार्गावरील घटना
सावली : तालुक्यातील बोथली- हिरापूर रोड वरील मार्कंडेय विद्यालयासमोर झालेल्या अपघातात दोघे ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.27) च्या रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली.
![]()
. या अपघातात हर्षद संदीप दंडावार (18) रा. बोरचांदली ता. मूल, साहिल नंदू गणेशकर (20) रा. भंगराम तळोधी यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहील अशोक कोसमशीले (21) रा. बोथली हा गंभीर जखमी असून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार साठी नेले मात्र त्याचा ही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
. शेतातून काम करून ट्रॅक्टर ही रस्त्याच्या कडेला लावून लाईट सुरू ठेवून एका सोबतीची वाट बघत असतांनाच केटीएम कंपनीची (एमएच – 34 सीएल – 3229) या दुचाकी वर तिघे जण भरधाव वेगाने जात असतानाच दुचाकी स्वराचा संतुलन सुटला आणि त्याने उभी असलेल्या ट्रॅक्टर (एमएच – 34 एपी – 1042) च्या मोठ्या चाकाला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हर्षद दंडावार याचा मृत्यू झाला. तर साहील कोसमशीले व बाईकवर असलेला तळोदी येथील त्यांचा मित्र साहिल गणेशकर गंभीर जखमी झाला. त्या दोघांना गडचिरोलीच्या रुग्णालयात नेताना साहिलचा वाटेतच मृत्यू झाला. तर कोसनशिले या युवकाचा उपचारांअंती मृत्यू झाला. तीनही युवक हिरापूर येथे नाटक पाहण्यासाठी जात असल्याचे बोलल्या जात आहे.
. सद्या रोड चे काम सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच सावली पोलीस घटनास्थळी आले व जखमींना उपचारासाठी भरती केले अपघाताचा तपास पोलीस पुढे करीत आहे. मात्र या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.


