सहा दिवस चालणार सांस्कृतिक मेळावा
त्वरित मैदान खाली करून देण्यासाठी खेळाडूंची मागणी
खेळाडुंचे तहसीदारांना निवेदन
वरोरा : वरोरा शहरातील खेळाडुंना खेळांचा सराव करण्यासाठी तालुका किडा संकुल उभारण्यात आले आहे. या भव्य क्रीडांगणावर रोज शेकडो विद्यार्थी वेगवेगळया खेळांचा सराव करून आपापल्या खेळात निपुण होण्याचा प्रयत्न करत असतात. या तालुका क्रीडा संकुलाने अनेक विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले. मात्र आता हे क्रीडा संकुल दरवर्षी मनोरंजनाच्या कार्यक्रमाला प्रशासन मंजुरी देत असल्याने विद्यार्थ्याच्या भवितव्यासोबत खेळत त्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करत असल्याच्या आरोप खेळाडूंनी केला आहे. याबाबत आलेख रट्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.
![]()
. या निवेदनात खेळाडूंनी म्हटले आहे की, एका पोस्टर ची किंमत 21 हजार रूपये, एका स्टॉल ची किंमत 10 हजार रू, स्क्वेअर फुट प्रमाणे जागेचा भाव ठरल्याचे समजते. खेळाडूंच्या जागेचा वापर आर्थिक व्यापार करण्यासाठी जास्त प्रमाणात होत असून बऱ्याच दिवसापासून खेळाडू याबद्दलचा आवाज उठवत आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणची कंपाउंड दुरुस्ती करण्यासाठी मोठा खर्च सुद्धा करण्यात आला होता. मात्र प्रशासनाची त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सर्वखेळाडू प्रशासनाचा निषेध नोंदवणार आहे. सध्या ग्राउंड वर जाण्यासाठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे धर्मदाय आयूक्त अधिकाऱ्यांनी या संस्थेचा आढावा घेऊन त्या पद्धतीचे ठराव मागून घेतले पाहिजे. संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ दखल घेत याबाबतचा निर्णय लावावा अशी मागणी खेळाडूंकडून होत आहे.


