Home सामाजिक इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल साठी रजनी चिलबुले यांची निवड

इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल साठी रजनी चिलबुले यांची निवड

1284

नागभीड : तालुक्यातील कर्मवीर विद्यालय नागभीड च्या विज्ञान शिक्षिका रजनी चिलबुले (कामडी) यांची इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल साठी (आयआयएसएफ ) विशेष निवड करण्यात आली आहे. हा फेस्टिवल प्रथमच ईशान्य भारतातील गुवाहटी – आसाम येथे येत्या 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान होणार आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील संशोधक, शास्त्रज्ञ या फेस्टिवल मध्ये उपस्थित राहणार आहेत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया तर्फे रजनी चिलबुले यांची सलग दुसऱ्यांदा विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याची दखल घेत निवड करण्यात आली आहे.

.       या फेस्टिवल मध्ये चांद्रयान, सायटेक एक्स्पो, सायन्स ओडिसी, मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड, न्यू नालंदा, प्रयाग भारत, नारी शक्ती, सायन्स हाथकान, यंग सायंटिस्ट कोन्क्लैव्ह, थ्रु लीडर राऊंड टेबल, गुरुकुला आणी स्टार्टअप आदी इव्हेंटचे सादरीकरण होणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण चंद्रयान तीन चे संयोजक आणी इस्त्रो चे चेअरमन डॉ. एस. सोमनाथ उपस्थित राहणार आहेत.

.       त्यांच्या या निवडीबद्दल डायट प्राचार्य डॉ. राजकुमार हिवारे, डायट चे प्रतिनिधी येनमूलवार, संस्था सचिव रवींद्र जनवार, संचालिका जनवार, नागभीड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी संजय पालवे, कर्मवीर विद्यालयाचे प्राचार्य देविदास चिलबुले, पर्यवेक्षक इडपाचे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष नन्नावार, पत्रकार पराग भानारकर व सर्व शिक्षक, शिक्षिका व विज्ञान प्रेमी यांनी अभिनंदन केले आहे. रजनी चिलबुले यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, पती प्रा. शिरीष यांची व कुटुंबियांना यांना दिले आहे.

     आपल्या ग्रामीण भागातील शिक्षकांनी अशा इव्हेंट्सला सहभागी होणे अतिशय आवश्यक आहे आणि NEP 2020 नुसार आपल्या अध्यापनामध्ये आपण वेगवेगळे बदल अध्यापन  करू शकतो हेच या फेस्टिवल चे उद्दिष्ट आहे. ग्रामीण व  शहरी भागातील विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर  सिद्ध करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे यश असून माझी दुसऱ्यांदा महाराष्ट्रातून इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल साठी विज्ञान आणी तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार कडून निवड करण्यात आहे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचे आंनद आहे.                                                                                                                                                                   रजनी चिलबुले (कामडी),                                              सहा.शिक्षिका,कर्मवीर विदयालय नागभीड 

error: Content is protected !!