जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांची विशेष उपस्थिती
नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था व डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समिती चे आयोजन
वरोरा : नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था व डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समिती वरोरा च्या वतीने 26 व 27 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथे भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी राहणार आहे.
. मंगळवारी सकाळी 7.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून सकाळी 8 वाजता संविधान सन्मान बाईल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी 5 वाजता निखिल राणे आणि संच यांचा भीमगीत जलसा कार्यक्रम होणार आहे. या नंतर सायंकाळी 7 वाजता नवी दिल्लीचे जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांचे भारतीय संविधानाची जडणघडण व संध्यास्थिती या विषयावर प्रबोधन तथा मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय बोधे, स्वागताध्यक्ष अॅड. अरविंद पेटकर, उद्धघाटक डॉ. उन्मेष भुजाडे तर प्रमुख अतिथी म्हणून अॅड भूपेंद्र रायपुरे राहणार आहे.
. तर बुधवारी दुपारी 3 वाजता नागरिकांचे संविधानिक मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धा होणार आहे. यात दोन गत ठेवण्यात आले. अ गटात 16 वर्षाखालील स्पर्धक तर ब गटात 16 ते 25 वर्षापर्यंत स्पर्धक सहभागी होणार आहे. यानंतर बक्षीस वितरण व मान्यवरांचा सत्कार होणार आहे. सायंकाळी 7 वाजता शिवशाहीर भगवान दादा गावंडे व संच अकोला यांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा व समस्त वरोरा व परीसरातील जनतेनी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


