जिल्ह्यात काँग्रेसचा सुपळा साफ
सर्वात अधिक लीड वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना
चंद्रपुर : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल पाच जागेवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपळा साफ केला. एका जागेवर काँग्रेसला समाधान मानाव लागल. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. ब्रम्हपुरी मतदार संघात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार वगळता बल्लारपुर मतदार संघात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपुरात किशोर जोरगेवार, वरोरा येथे करण देवतळे, चिमूर येथे किर्तीकुमार भांगडीया व राजुरा येथे देवराव भोंगळे यांनी विजय मिळविला आहे.
![]()
. चंद्रपुर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सहा मतदार संघ आहेत. यापैकी सर्वात धक्कादायक व अनपेक्षित निकाल हा राजुरा या कुणबी बहुल मतदार संघातील आहे. येथे भाजपाचे देवराव भोंगळे पहिल्या फेरीपासून मागे होते. मात्र बाराव्या फेरीनंतर अनपेक्षितपणे मतांची आघाडी घेत समोर गेले व 3054 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचा पराभव केला. चिमूर क्रांतीभूमित किर्तीकुमार भांगडीया यांनी 9853 मतांनी काँग्रेसचे सतिश वारजूरकर यांचा पराभव केला. विशेष म्हणजे या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस खासदार राहुल गांधी या दोघांच्याही सभा झाल्या होत्या. येथे मोदी जिंकले तर गांधी हरले अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
. बल्लारपुर मतदार संघात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल 25985 मतांनी काँग्रेसचे संतोषसिंग रावत यांचा पराभव केला. तर चंद्रपुरात भाजपाचे किशोर जोरगेवार यांनी 22804 मतांनी काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांचा पराभव केला. वरोरा येथे भाजपाचे करण देवतळे यांनी 15450 काँग्रेसचे प्रवीण काकडे यांचा पराभव केला. तर शिवसेना (उबाठा) चे बंडखोर अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांनी तब्बल 49720 मते घेत दुसर्या क्रमांकावर राहिले. तर ब्रम्हपुरीत काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 14088 मतांनी भाजपाचे कृष्णलाल सहारे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे मतांची आघाडी घेतांना वडेट्टीवार यांची चांगलीच दमछाक होताना दिसून आली. पहिल्या काही फेरीत वडेट्टीवार माघारले होते. 14 व्या फेरी अखेर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 6346 मतांनी आघाडी घेत विजयी मिळविला.
राजुरा येथे मतमोजणी थांबवली चंद्रपूर – राजुरा मतदारसंघातील मतमोजणी सुरू असताना चार ईव्हीएम मशीनचे सील तुटलेले, तर एक मशीन बदललेली दिसून आल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला असता मतमोजणी थांबविण्यात आली होती. मशीनचे सील कसे काय तुटले याबाबत काँग्रेसच्या उमेदवारांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. दरम्यान काही काळ वातावरण तापले होते.


