Home विशेष छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या मतदारांनी भाजपच्या त्रिमूर्ती सरकारला पराभूत करा –...

छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या मतदारांनी भाजपच्या त्रिमूर्ती सरकारला पराभूत करा – वसंत मुंडे

1318

 मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी मजूर सुशिक्षित बेकार कामगार महिला बारा बलुतेदार प्रशासन यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आघात करून जनतेला सर्व संकटात झोकून देणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपा समर्थक त्रिमूर्ती सरकारचा पराभव करून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला प्रचंड मतांनी विजय करण्याचे आव्हान महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.

.      राजकीय पक्ष फोडणारे आमदार चोरणारे जातीजातीमध्ये द्वेष निर्माण करणारे बहुजनावर लाठी चार्ज करणारे चिन्ह लुटणारे पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणारे वारकऱ्यावर लाठी चार्ज करणारे महाराष्ट्र मधील प्रकल्प डायमंड बोर्स मरीन अकॅडमी वेदांत फॉक्स्वाॅन वल्क ड्रगमार्क मेडिकल डिव्हाईस मार्क टाटा एयर बस इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर गुजरातला पळून घेऊन जाणारे, बलात्कार करणाऱ्यांना पाठिंबा देणारे सोयाबीन ब्राझील मका अर्जेंटिना कांदे अफगाणिस्तान हरभरा ऑस्ट्रेलिया मधून शेतकऱ्याचा माल तयार झाला की परदेशातून आयात करून आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव बाजारपेठेमध्ये पाडणे या सर्व बाबीचा विचार करण्याची मतदार बंधूंना परिवर्तनाची वेळ आलेली असून १०० काळे धन आले नाही नोटबंदी चुकीच्या पद्धतीने हाताळली विमानतळे बंदरे रेल्वे आदाणी,अंबानी या कंपन्याला दिली, पेट्रोल डिझेल गॅस दैनंदिन जीवनावश्यक वस्तू महाग केल्या दोन कोटी रोजगार दिला नाही स्मार्ट शंभर सिटी केल्या नाहीत डॉलरच्या मुकाबलातआपल्या रुपयाचे अवमूल्यन झाले.

.     इलेक्ट्रिक बॉण्डच्या माध्यमातून पंतप्रधानांनी हप्ता वसूल केला टीईटी घोटाळा महापरीक्षा घोटाळा तलाठी पेपर, मुंबई पोलीस पेपर, महानिर्मिती पेपर, वन विभाग पेपर, मृद जलसंधारण पेपर फुटी परीक्षा घोटाळा, मीडियात मध्ये घोटाळा आहे. न्यायव्यवस्था हतबल गुन्हेगार बलात्कारी भ्रष्ट नेते यांना सहकार्य करून भारतीय जनता पार्टीच्या त्रिमूर्ती सरकारने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे व खते बी बियाणे कीटकनाशके औषधी वर जीएसटी कर लावण्याने सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत. कोविड काळात आर्थिक लूट इंजेक्शन व ऑक्सीजन चा तुटवडा केला मुळे लाखो लोकांचा जीव गेला. महिला कुस्तीपटू चा अपमान केला तीन शेतकरी कायदे रद्द केले नाहीत ७०० शेतकऱ्यांचा आंदोलनात मृत्यू झाला चौकशी केली नाही. जातीनिहाय जनगणना केली नाही, आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, पिक विमा दिला गेला नाही, अतिवृष्टी व दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले नाहीत, कापूस सोयाबीन प्रती हेक्टरी पाच हजार रुपयाची घोषणा केली.

.    प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले नाहीत, देशातील व राज्यातील शेतकऱ्याचे सर्व आंदोलने देशद्रोही ठरवून 64 उद्योगपतीचे कर्ज माफ केले यूपीसी व एमपीसी च्या परीक्षा वेळेवर घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासन जागा रिक्त आहेत. आदानी अंबानीच्या इशाऱ्यावर भारतीय जनता पार्टीचे सरकार देशात व राज्यात राज्य करीत आहे तरी मतदार बंधूंनी शेतकरी कामगार मजूर विद्यार्थी कर्मचारी बारा बलुतेदार अल्पसंख्यांक ओबीसी बांधवांनी सर्व बाजूने विचार करून त्रिमूर्ती अकार्यक्षम सरकार महाराष्ट्रातून मतदानातून तडीपार करून महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्या असे कळकळी आव्हान काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केले.

error: Content is protected !!