Home चंद्रपुर जिल्हा विशेष भाजपाचे रमेश राजूरकर थोडक्यात बचावले

भाजपाचे रमेश राजूरकर थोडक्यात बचावले

1331

भाजपाच्याच वाहनाने मारली राजूरकरच्या वाहनाला कट

बोर्डा चौकातील घटना

चंद्रपूर : शुक्रवारी चंद्रपूर येथे स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड मध्ये जिल्ह्यातील भाजपाच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शाहा यांच्या सभेचेआयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी वरोरा शहरातून मोठ्या प्रमाणात भाजपा समर्थक चंद्रपूर कडे रवाना झाले. त्याच दरम्यान वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर आपल्या वाहनाने चंद्रपूर कडे निघाले दरम्यान भाजपाच्याच एका भरधाव वेगात असलेल्या वाहनाने त्यांचा वाहनाला जोरदार कट मारली. यामुळे राजूरकरांच्या वाहन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि राजूरकरांची कार दुभाजकावर चढली मात्र सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने राजूरकर थोडक्यात बचावले. भाजपाच्या वाहनाने भाजपा नेत्याच्याच वाहनाने कट मारल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

.      प्राप्त माहिती नुसार देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे दुपारी 4 वाजता जिल्ह्यातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या साठी जिल्हाभरातून भाजपा चे कार्यकर्ते चंद्रपूर कडे रवाना झाले. दरम्यान वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर हे आपल्या मुलासोबत फार्चूनर कारने दुपारी 2 वाजताच्या सुमारास रवाना झाले. दरम्यान चंद्रपूर नागपूर मार्गांवरील वरोरा शहरातील बोर्डा चौका जवळ वरोरा विधानसभा चे उमेदवार करण देवतळे यांच्या सोशल मीडिया च्या वाहन क्रमांक 1212 या वाहन चालकाने राजूरकरांच्या फार्चूनर क्रमांक 5252 ला जोरदार कट मारला. यामुळे राजूरकरांचे वाहन दुभाजकावर भिडले मात्र चालकाच्या सतर्कतेने राजूरकराचे वाहन पलटी होता होता थोडक्यात बचावले. राजुरकरांचेसुपुत्र मुकुल यांनी जाब विचारण्यासाठी सोशल मीडियाचे वाहनाचा पाठलाग केला. आणि घोडपेठ गावाजवळ वाहन थांबताच सोशल मीडियाच्या वाहनाच्या चालकांकडून राजूरकरांना शिवीगाळ केल्याने बाचाबाची करत मारहाण सुद्धा करण्यात आल्याची चर्चा आहे.

रमेश राजूरकर यांच्यावर भाजपा चा सूड तर नाही ना                                                                                                                         वरोरा विधानसभा मतदार संघांसाठी रमेश राजूरकर इच्छुक होते. मात्र भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरून बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला. मात्र ते अजूनही नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. राजूरकर हे भाजपा पक्षाचे काम करीत आहे की प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले आहे. की दुसऱ्या उमेदवाराला सहकार्य करत आहे . यातून तर त्यांचा सूड काढण्याचा प्रयत्न होत तर नाही ना अशा चर्चेला आता उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी वरोरा येथे जागा पाहत होतो. त्यानंतर चंद्रपूर येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी निघालो असताना वरोरा शहरातील बोर्डा चौकात करण देवतळे यांच्या सोशल मीडियाच्या वाहनाने माझ्या कारला कट मारली. मात्र चालकाच्या सतर्कतेने थोडक्यात बचावलो.                                                                                                                रमेश राजुरकर,                                                           भाजप वरोरा विधानसभा प्रमुख

error: Content is protected !!