चंद्रपूर : महायुतीचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय परिवहन मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी हे आज बुधवारी (दि.13) चंद्रपूरात असणार तर घुग्घुसला दुपारी 1.30 येथील बसस्थानकाजवळील लॉयड मेटल परिसरात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची आज बुधवारी घुग्घुस येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. घुग्घुस येथील बसस्थानका जवळील लॉयड मेटल परिसरात सदर सभा पार पडणार असून, ग्रामीण भागासह घुग्घुस परिसरातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


