Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपूर पोलिसांनी अवैधरित्या डिझेलची वाहतूक पकडली

बल्लारपूर पोलिसांनी अवैधरित्या डिझेलची वाहतूक पकडली

1338

बामणी (दुधोली) टी पॉईंट वरील घटना

पिकअप वाहनासह ६ लाखांचा ऐवज जप्त

विसापूर : राजुरा येथून एका पिकअप वाहनात अवैधरित्या डिझेल येत आहे. याची माहिती खबरीच्या माध्यमातून बल्लारपूर पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी बामणी (दुधोली) येथील टी पॉईंट या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी पिकअप वाहन येताच थांबवले. त्याची तपासणी केली. त्यात 3८ ‌‌केन अवैधरित्या डिझेल भरलेल्या आढळून आल्या.या प्रकरणी पोलिसांनी पिकअप वाहनासह ६ लक्ष रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई बल्लारपूर पोलिसांनी शनिवार ला सकाळी ८ वाजता दरम्यान केली.

.      राजुरा येथून बल्लारपूर मार्गे चंद्रपूर कडे पिकअप वाहन क्रमांक (एम.एच.34 / बी.झेड.४८१८ ) अवैधरित्या डिझेलची वाहतूक करत होते. यामध्ये 3८‌‌ केन मध्ये प्रत्येकी 35 लिटर डिझेल भरले होते. सदर वाहन पोलिसांनी बामणी (दुधोली) चौरस्त्यावर येताच थांबवले. पिकअप वाहनात अवैधरित्या डिझेलची वाहतूक केली जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. चालक म्हणून विधीसंघर्ष बालक होता. याप्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी १ लक्ष १६ हजार रुपये किंमतीचे अवैधरित्या डिझेल व पिकअप वाहन अंदाजे ५ लक्ष रुपये असा एकूण ६ लक्ष १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई बल्लारपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गाडे, गजानन डोईफोडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

error: Content is protected !!