Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतात विष घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

शेतात विष घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

1702

आसाळा येथील घटना

वरोरा : कर्जबाजारीला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. धरमदास नानाजी डुकरे (36) असे मृतक तरुण शेतकर्‍याचे नाव आहे.

.      मृतक धरमदास हा तालुक्यातील आसाळा येथील रहिवाशी असून तो अल्प भूधारक शेतकरी आहे. तरुण शेतकरी यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून टोकाचे पाऊल घेत कीटकनाशक प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. असल्याचे बोलल्या जात आहे.

.      या वर्षी सुरवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी नंतर सततच्या पावसाने झालेली शेतपिकाची नासाडी तसेच परतीच्या पावसाने झालेली नुकसान याही संकटामधून वाचलेल्या पिकाला योग्य तो भाव आणि शासनाकडून मिळणारी तुटपुंजी मदत या संकटातून मधून पडून कर्जबाजारी पणातून बाहेर पडता येणार नाही म्हणून शेवटचे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले. त्यांच्या मागे पत्नी, विधवा आई, 14महिन्याचे बाळ आणि लहान भाऊ अशा परिवार आहे.

error: Content is protected !!