Home चंद्रपुर जिल्हा विशेष शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा

शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा

1300

सहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

जि. प. प्राथमिक शाळा सिंदेवाही हेटी येथील घटना

सिंदेवाही : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही हेटी क्रमांक २ मध्ये शनिवारी दुपारी शालेय पोषण आहार घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना चक्कर आली. व उलट्या सुरू झाल्याने त्या विद्यार्थ्यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

.      जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक शाळेत शासनाच्या शालेय पोषण आहाराचे विद्यार्थांना दुपारी जेवण दिल्या जात असून सिंदेवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेटी क्रमांक २ मध्ये दुपारी ३० विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. जेवण घेतल्यानंतर काही वेळातच  अंकिता रामटेके, पल्लवी नाकाड़े, श्रावणी खोब्रागडे, प्रियंका साखरे, माहेष्वरी डोंगरे,वेदांत झाकरांडे यांना उलट्या सुरू होऊन चक्कर यायला सुरुवात झाली. त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक यांनी   विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना देऊन सर्वांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे भरती केले. विद्यार्थ्यांच्या जेवणात किंवा पिण्याच्या पाण्यात काहीतरी पडले असावे असा अंदाज पालकांनी बांधलेला आहे. शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांची चौकशी केल्यास काय प्रकार आहे. तर लक्षात नक्कीच येईल. अशी पालकांमध्ये चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात विषबाधा झाला असल्याचे पालकांनी प्रसार माध्यमांकडे बोलून दाखविले आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी. तसेच विषबाधा सारखा गंभीर प्रकार घडल्या नंतरही शाळेचे केंद्रप्रमुख, पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी, भागशिक्षण अधिकारी, किंवा कोणतेही अधिकारी शाळेला किंवा रुग्णालयात भेट दिली नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकारची तात्काळ चौकशी करून कशामुळे विषबाधा झाला ? याचा बाबत खुलासा करावा. अशी मागणी पालकांनी केली आहे.

 शाळेतील एकूण ३० विद्यार्थ्यांना एकाचवेळी जेवण दिले आहे. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना उलट्या , आणि चक्कर आलेली आहे. तसेच मी स्वतः तेच जेवण केले आहे. तेव्हा मला थोडावेळ चक्कर येत होती. नंतर बरे वाटायला लागले.   सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांची रुग्णालयातून सुट्टी झाली असून सर्वजण सुखरूप आहेत.                                                                                                              अस्मिता रामटेके,                                                                      मुख्याध्यापिका,                                                     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेटी क्र. २ सिंदेवाही.

 

error: Content is protected !!