Home पोलीस डायरी लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्ष शिक्षा

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्ष शिक्षा

1354

नागभीड टाऊन मधील घटना

नागभीड पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी

नागभीड : अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास आणि. दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी ठोठावली. लिलाधर उर्फ दादु चंद्रज्योती लांजेवार वय २१ वर्ष रा. नागभीड असे आरोपीचे नाव आहे. दंडाची रक्कम भरली नाही तर आणखी एक वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

.       प्रस्तुत प्रकरणातील आरोपी व पिडीत है एकमेकांना ओळखतात दिनांक ९/७/२०२२ चे रात्री २०/१५ वा. आरोपी लिलाधर उर्फ दादु चंद्रज्योती लांजेवार (२१) रा. नागभीड हा पिडीता फिर्यादीचे घरी गेला असता फिर्यादीचे आईने आरोपीस अंडे आणण्याकरीता सांगितले तेव्हा आरोपीने मला दुकान माहीत नाही, असे बोलुन पिडीत मुलीस दुकान दाखव, असे बोलुन पिडीत मुलीला मोटार सायकलवर बसवुन तिला गोवा कॉलेजच्या मागे घेवुन गेला. व तिथे तिला मारहान करून कॉलेजच्या बाथरुम मध्ये तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. अशा पिडीताचे तोंडी रिपोर्ट व मेडीकल रिपोर्ट वरुन पो.स्टे. नागभीड येथे दिनांक १०/०७/२०२२ रोजी अपराध क्रमांक २१९/२०२२ कलम ३५४(३१),३७६(१) (ए),३७६(३), ३७७,३२३, भा.द.वी सहकलम ४ पोक्सो अधिनियमान्वये गुन्हा नोद करण्यात आला.

.       प्रस्तुत गुन्हयाचा तपास पो.उप.नि. स्वाती फुलेकर, पोक्सो पथक ब्रम्हपुरी यानी केला असुन त्यानी आरोपी लिलाधर उर्फ दादु चंद्रज्योती लांजेवार वय २१ वर्ष रा. नागभीड यास गुन्हयात अटक केली. तपासा दरम्यान अतिशय बारकाईने पुरावे गोळा करुन त्याचे विरुध्द मा.अति. सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांचे न्यायालयात दि.०७/०९/२०२२ रोजी दोषारोपपत्र सादर केले.

.       प्रस्तुत प्रकरणी देवेंद्र महाजन सहाय्यक शासकीय अभियोक्ता यांनी सरकारी पक्षातर्फे मा. न्यायालया समक्ष
योग्य बाजु मांडली. प्रस्तुत प्रकरणाचे सुनावणीअंती अ.व्ही. दिक्षीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी आरोपी लिलाधर उर्फ दादु चंद्रज्योती लांजेवार (२१) रा. नागभीड यास खालील प्रमाणे शिक्षा सुनावली. १) कलम ३७६ (१) (ए), ३७६ (३), भा.द.वी सह कलम ४ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व ५०००/-रु दंड, दंड न भरल्यास १२ महिने सश्रम कारावास २) कलम ३७७ भा.द.वि मध्ये ७ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रु दंड, दंड न भरल्यास १० महिने सश्रम कारावास ३) कलम ३५४ (अ) भा.द.वि मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व ३०००/- रु दंड, दंड न भरल्यास ८ महिने सश्रम कारावास ४) कलम ३२३ भा.द.वि मध्ये ६ महिने साधा कारावास व १०००/- रु दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

.       सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपुर, रिना जनबंधु अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात स. फौ. कुंदन वाघमारे पो. हवा. मुल्लेमवार, पो.अं. अजित, पो.अं. रोहीत विनोद पो.स्टे. नागभीड यांनी पार पाडली.

error: Content is protected !!