Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापुरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

विसापुरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

1455

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

विसापूर : घरातील मुलगा चंद्रपूर येथील धम्मचक्र अनुवर्तन कार्यक्रमाला गेला होता. पत्नी घराशेजारी कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली. घरी कोणीच नाही. ही संधी साधून बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बुधवारी मध्य रात्री येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये घडली. आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव विनोद पांडुरंग भैसारे ( ४५ ) रा. विसापूर असे आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील विनोद भैसारे हा कुटुंबा सोबत राहत होता. तो बल्लारपूर पेपर मिल मध्ये एका मालकाचे ट्रक ट्रैक्टर चालक म्हणून काम करत होता. घटनेच्या अगोदर त्याचे आईवडील भद्रावती येथील नातेवाईकांकडे गेले होते. घरी मुलगा, त्याची पत्नी होती. मात्र, घटनेच्या दिवशी मुलगा चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला गेला. त्याची पत्नी कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली.

.      दरम्यान रात्री उशिरा मुलगा घरी आला. त्यावेळी मुलाला वडील विनोद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती त्याने आईला दिली. विनोद ने अचानक आत्महत्या केल्यामुळे घरातील मंडळी गोंधळून गेले. या घटनेची माहिती कुटुंबियांनी विसापूर येथील पोलीस चौकी ला दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे हलविण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात विसापूर पोलीस करत आहे.

error: Content is protected !!