Home चंद्रपुर जिल्हा विशेष बेकायदा साठवणूक केलेला भंगार साठा जप्त 

बेकायदा साठवणूक केलेला भंगार साठा जप्त

1269

चार जणा विरुद्ध गुन्हा दाखल

माजरी पोलिसांची कारवाई

१३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील माजरी येथील एकता नगर कॉलनीत खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या भंगार साठा ठेवण्यात आला होता. याप्रकरणी माजरी पोलिसांनी चार जणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

.      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी एकता नगर माजरी कॉलरी येथील  विजय रामलाल केवट (२७),  विकास रामलाल केवट (३१), तीरथ शंकर निर्मलकर (४०), मुकेशकुमार संतोष यादव (३६) यांच्या घरासमोर मोकळ्या जागेवर भंगार साहीत्य लोखंडी राड अवैध रित्या आणून ठेवलेले आहे. अशी गोपणीय माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरी जावून पाहणी केली असता, विजय रामलाल केवट यांचे घराचे अंगणात अंदाजे वजन ६५  किलो भंगार लोखंडी राड किंमत १ हजार सहाशे २५ रुपये, विकास रामलाल केवट यांचे घराचे अंगणात अंदाजे वजन ६५ किलो भंगार लोखंडी राड किंमत १ हजार सहाशे २५ रुपये, तीरथ शंकर निर्मलकर यांचे घराचे अंगणात अंदाजे वजन ५०  किलो भंगार लोखंडी राड किंमत १ हजार दोनशे ५० रुपये, मुकेशकुमार संतोष यादव यांचे घराचे अंगणात अंदाजे वजन ६० किलो वजनाचे भंगार किंमत  १ हजार ५००  रुपये व एक बजाज डिस्कव्हर कंपनीची उभी दुचाकी वाहन क्रमांक एम.एच.३३ एच. ६९१२  ज्यावर अंदाजे ११० किलो वाजनाचे लोखंडी राड किंमत  २ हजार सातशे ५० रुपये व  दुचाकी वाहनाची किंमत ५ हजार रुपये असा एकूण १३ हजार सातशे ५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.  कारवाई दरम्यान दुचाकी वाहन चालक मिळून आलेला नाही.

.      या कारवाईत मिळून आलेले चार ईसमांना सदर मालाबाबत मालकी हक्काबाबत बिल पावती व ईतर कागदपत्र विचारले असता, त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले. यावरुन त्या ईसमांनी जप्त मुद्देमाल कोठून तरी चोरीने किंवा लबाडीने प्राप्त केला असावा.  असा संशय आल्याने त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे माजरी येथे अदखलपात्र गुन्हा क्रमांक ७४/२०२४ कलम १२४ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर जप्त मुद्देमाल माजरी येथील वेकोलिच्या कोळसा खाणीतील असल्याची माहिती मिळाल्याने वेकोलि माजरीच्या क्षेत्रीय प्रबंधक यांना मालाची शहानिशा करून अहवाल सादर करण्याबाबत पत्र देण्यात आले. तसेच सदर गुन्ह्याचा सखोल तपास करण्या- करीता न्यायालयाला सुद्धा पत्र देण्यात आले आहे.

.      सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम व ठाणेदार अमितकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनात ग्रेट पोउपनि  पंचोडबरीया, पोहवा हरी देऊळकर व पोअं कोटरंगे यांनी केली आहे.

वेकोली खाणीत भंगार चोरट्यांची टोळी सक्रिय                                                                                                                          वेकोलिच्या खाणीतून निघणाऱ्या भंगारचा वेकोलिकडून रितसर लिलाव न करता खाणीतच साठवला जातो. याच संधीचा फायदा घेत भंगार चोरटे खाणीत शिरून मोठ्या प्रमाणात भंगार चोरी करतात. वेकोलिच्या खाणीत भंगार चोरट्यांची अनेक टोळ्या सक्रिय आहेत. मात्र माजरी पोलीस ठाण्यात नवनियुक्त ठाणेदार अमितकुमार पांडेय रुजू झाल्यापासून वेकोलिच्या खाणीतून भंगार चोरीवर अंकुश लागले आहे.

error: Content is protected !!