Home चंद्रपुर जिल्हा विशेष डाक सेवा कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप कमी

डाक सेवा कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप कमी

1306

लाभार्थी महिला त्रस्त

एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार

भद्रावती : डाक सेवा कार्यालयामधून शासनाच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांनी मागणी केलेल्या पैशांपेक्षा कमी देत असल्याने लाभार्थी त्रस्त आहेत. विशेषत: लाडकी बहिण योजनेत महिला लाभार्थी आहेत. त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

.        अलीकडे शासनाने लाडकी बहीण योजना आणली. प्रत्येक पात्र महिलेला महिना १,५०० रुपये देण्यात येत आहे. शासनाच्या सांगण्यानुसार अनेक महिलांनी डाक सेवा कार्यालयात आपले खाते काढले. लाभार्थी महिला आपल्या खात्यात आलेले पैसे काढण्याकरीता पोस्ट कार्यालयात गेले असता त्यांनी मागणी केलेले पूर्ण पैसे न देता कमी पैसे दिल्या जात आहे. या डाक सेवा कार्यालय मध्ये ग्रामीण भागातील अनेक महिलांनी खाते काढले. त्या सकाळी ९ वाजताच रांगा लावून असतात. पोस्ट कार्यालयास दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार असल्याने अनेक महिलांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. असल्या प्रकाराने लाभार्थी महीला त्रस्त झाल्या आहेत.

.        याबाबत डाक खात्याचे प्रभारी अधिकारी गणेश पुलगमवार यांना विचारणा केली असता आम्हाला दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला थोडी थोडी रक्कम दिल्या जाते. या व्यतिरिक्त पिक विमा योजना आणि इतर योजनांच्या पैशाचे वाटप याच रकमेतून करावे लागत आहे. वाटपाच्या वाढीव रकमेची आम्ही वरिष्ठअधिकारी कडे मागणी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!