Home चंद्रपुर जिल्हा विशेष दोन देशी बनावटीच्या पिस्तूल सह चार आरोपींना अटक

दोन देशी बनावटीच्या पिस्तूल सह चार आरोपींना अटक

1309

बल्लारपूर पोलिसांची कारवाई 

बल्लारपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगत आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या व घातक शस्त्र बाळगणाऱ्यावर शिकंजा कसत आहे. याच मोहिमेंतर्गत बल्लारपूर पोलिसांनी दोन देशी बनावटीच्या पिस्तूल सह चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई रविवार ला सांयकाळी ६ वाजता व रात्री १ वाजता दरम्यान केली. या घटनेमुळे ग्रामीण भागात देखील गुन्हेगारीचे धागेदोरे असल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.

.         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बल्लारपूर तालुक्यातील बामणी ( दुधोली ) येथील फुकटनगर मध्ये राहणारे कश्मिरसिंग महेंद्रसिंग बावरी यांच्या घरांची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांचे अवसान गळाले. त्याच्या घरी जुन्या वापरातील लोखंडी बनावटीचे देशी पिस्तूल, खाली मॅगझिन असलेले अग्नीशस्त्र,७ एम.एम.चे पिस्तूल आढळून आले. तर दुसऱ्या घटनेत त्याच दिवशी मध्य रात्री १ वाजता दरम्यान राजुरा तालुक्यातील सुब्ब ई येथील आकाश बाबुराव चाफले (२४) व प्रणय मारोती जुनघरे (२3) आणि बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डातील रहिवासी परविंदरसिंग चांदसिंग बावरी यांच्या ताब्यातून ७ एम.एम.चे जुन्या बनावटीचे देशी पिस्तूल जप्त केले आहे.

.         याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आर्म अॅक्ट नुसार गुन्हा क्रमांक ९५८/२0२४ व ९५९/ २0२४ अन्वये अनुक्रमे 3,25 व 7, 27 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत आरोपी कश्मिरसिंग महेंद्रसिंग बावरी रा.बामणी ( दुधोली ) फुकटनगर ता.बल्लारपूर, आकाश बाबुराव चाफले ( २४ ) ,प्रणय मारोती चाफले ( २3 ) रा.सब्ब ई ता.राजुरा व पलविंदरसिंग चांदसिंग बावरी रा. कन्नमवार वार्ड, बल्लारपूर यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. देशी बनावटीच्या पिस्तूल द्वारे आरोपींचा कोणकोणत्या घटनेत सहभाग आहे, याचा शोध बल्लारपूर पोलीस घेत आहेत. पहिल्या घटनेतील पिस्तूल ची किंमत १0 हजार रुपये, तर दुसऱ्या घटनेतील पिस्तूल ची किंमत २५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

.         ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सहायक पोलीस निरीक्षक ए.एस.टोपले, उपनिरीक्षक हुसेन शाह, गजानन डोईफोडे, आनंद परचाके, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनील कामटकर, पुरूषोत्तम चिकाटे, शेखर माथनकर, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, अनिता नायडू, विकास खंदारे यांच्या पथकाने केली आहे.

error: Content is protected !!