Home सामाजिक भिसी येथे वन्यजीव सप्ताह निमीत्या जनजागृती रॅली

भिसी येथे वन्यजीव सप्ताह निमीत्या जनजागृती रॅली

1369

चिमुर : वनपरिक्षेत्र चिमूर व महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महा. भिसी यांचे संयुक्त विद्यमाने भिसी येथे दि. 7 ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह निमीत्य जनजागृती रॅली काढण्यात आली.

.       1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत संपुर्ण भारतभर वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने भीसी वनपरीमंडळाअंतर्गत महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महा. भिसी व वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली काढुन जनजागृती करण्यात आली. वन्यजीव सप्ताह 2024 अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी भिसी वनपरीमंडळाने कार्यकम आयोजीत करून वन्यजीव सप्ताह साजरा केला. त्यामध्ये वन्यजीव सप्ताहाचा शेवट जनजागृती रॅली काढुन केला.

.       महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महा. भिसी पासुन वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देउळकर तसेच थुटे प्रभारी मुख्याध्यापक यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरूवात केली. तत्पूर्वी तेथे वनाधिकारी यांनी विद्यार्थ्याना वन्यजीव सप्ताहा निमीत्य मार्गदर्शन केले त्यात किशोर देउळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, संतोष औतकर, वनपरिमंडळ अधिकारी भिसी उत्तम घुगरे वनपरिमंडळ अधिकारी खडसंगी यु.बी. लोखंडे वनपरिमंडळ अधिकारी चिमुर गोपीनाथ ठोंबरे तंटामुक्ती अध्यक्ष भिसी, यांनी वन व वन्यजीवन बाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना वन व वन्यजीवाबाबत माहीती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कपाळे वनरक्षक भिसी यांनी तर आभार प्रदर्शन बोरकर सहा. शिक्षक यांनी केले.

.       सदर रॅली महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महा. भिसी शनिवार पेठ- ग्राम सचिवालय-बाजार चौक जुनी ग्रामपंचायत चौक ते गांधी शाळा समारोप. अशी करण्यात आली. रॅलीत महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महा. भिसी चे वर्ग 5 ते कनिष्ठ महाविद्यालय चे विद्यार्थी उपस्थीत होते. रॅलीचा समारोप महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महा. भिसी येथे झाला.

.       कार्यक्रमासाठी आर.डी. मेश्राम, वनपरीमंडळ अधिकारी चिमुर आर.डी. नैताम वनपरिमंडळ अधिकारी गस्त पथक चिमुर, व त्याचे कर्मचारी, अक्षय मेश्राम, बोरकर वनरक्षक, रूपेश केदार, रूपेश चौधरी, पाटील, भिवापुरे, गायकवाड, सोनुले, भुरले, अक्षय मेश्राम, यशवंत पोतराजे, नंदनवार, प्रदीप ढोणे व ईत्यादी कर्मचा-यांनी कार्यकमाच्या यशस्वीतेकरीता अथक प्रयत्न केले.

error: Content is protected !!