वरोरा : तालुक्यातील केळी येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने महाबीज उत्पादीत बियाणे, पीक पाहाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने बियाणे उत्पादन कार्यक्रम मागील 15 वर्षापासून राबवण्यात येत आहे. केळी येथील प्रगतीशील शेतकरी राजू झापर्डे, अशोक बुटे, पराग इंगोले, हनुमान महल्ले व परिसरातील शेतकरी बिजोत्पादन करतात. त्यात प्रामुख्याने सोयाबीन तुर, चना, गहु याचे बिजोत्पादन होते. यावेळी सोयाबीन जे. एस. 20116 या जातीचा पिक पाहाणी कार्यक्रम संपन्न झाला.
. यावेळी महाबीजचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख शेख, ढवळे, खांबाळा येथील प्रगतीशील शेतकरी आनंदराव भोयर, मुरदगाव येथील गोंडे (माजी अधिकारी बिज प्रमाणीकरण यंत्रणा महाराष्ट्र शासन) व येवती येथुन अंबादास टोंगे, नागरी येथुन भारत घुबडे, केळी येथील बुटे, नरेंद्र ठाकरे, ज्ञानेश्वर महल्ले व परिसरातील शेतकरी बांधव, विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


