Home सामाजिक विदर्भ तेली महासंघाच्या जिल्हा संघटक पदी नरेंद्र इटनकर यांची निवड

विदर्भ तेली महासंघाच्या जिल्हा संघटक पदी नरेंद्र इटनकर यांची निवड

1327

विसापूर : येथील तेली समाजाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काशिनाथ इटनकर यांची विदर्भ तेली समाज महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड पत्राद्वारे विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय बेले व कार्याध्यक्ष डॉ.नामदेव वरभे यांनी केली आहे. या नियुक्तीचे समाज बांधवांनी स्वागत केले आहे.

.        विदर्भात तेली समाजाची संख्या मोठ्या संख्येने आहे. विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्य चंद्रपूर जिल्हा पातळीवर मोठे आहे. समाजातील कार्यात विसापूर येथील अध्यक्ष नरेंद्र इटनकर यांचे विशेष योगदान आहे. त्यांचे सामाजिक कार्य देखील उल्लेखनिय आहे. या अनुषंगाने जिल्हा पातळीवर त्यांच्या कार्याची महती व्हावी. समाज संघटना बांधणी वाढावी. त्यांचे संघटन कौशल्य समाजाच्या हितासाठी, विकासासाठी व सर्वसामान्य समाज बांधवांसाठी उपयोगी ठरण्यासाठी नरेंद्र इटनकर यांची चंद्रपूर जिल्हा विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक म्हणून निवड झाली आहे.

.        त्यांच्या निवडीबद्दल विसापूर येथील तेली समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक सुभाष हरणे, बालाजी शेंडे, माजी सरपंच बंडू गिरडकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा इटनकर, गजानन पाटणकर, प्रविण गिरडकर, प्रितम पाटणकर, विजय गिरडकर, सुरेश इटनकर, आकाश गिरडकर, गजानन बावनकुळे, भास्कर ठाकरे, संजय बावणे, प्रकाश खनके,जनार्दन पाटणकर, बंडू बावणे, राजू गिरडकर,अमोल खनके,डॉ. सुनील बुटले आदींनी स्वागत केले आहे.

error: Content is protected !!