गडचांदूर : येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आघाडीवर राष्ट्रीय परिषद या विषयावर एक दिवसीय विज्ञान परिषद आयोजित करण्यात आली होती. विज्ञानाच्या आधारेच विकास साधता येतो मात्र मानवी मूल्याची जपवणूक करूनच हा विकास व्हायला हवा, असे प्रतिपादन उदघाटन सत्राचे अध्यक्ष सुभाष धोटे आमदार राजुरा विधानसभा व अध्यक्ष, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडल गडचांदूर यांनी व्यक्त केले.
. या परिषदेचे उदघाटन डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी केले. याप्रसंगी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे सचिव धनंजय गोरे, सहसचिव उज्वला धोटे उपस्थित होते. ही विज्ञान परिषद अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या सहकार्याने घेण्यात आली. कंपनी चे जॉईंट प्रेसिडेंट व युनिट हेड अतुल कंसल व सिनिअर वाईस प्रेसिडेंट व एच. आर हेड मुकेश गहलोत यांनी मार्गदर्शन केले. विज्ञानाच्या विविध पैलूचा वापर करूनच गडचांदूर येथील वाढता धूर रोखल्या जाऊ शकते. असे त्यांनी सांगितले.
. सर्व पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा प्राचार्य, डॉ. शैलेंद्र देव यांनी सादर केला. तर कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजक डॉ संदीप घोडीले संचालन डॉ. उत्कर्ष मून व शेवटी आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. मनोहर बांदरे यांनी केले.


