Home सामाजिक नेरी येथे सामाजिक सभागृह व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

नेरी येथे सामाजिक सभागृह व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

1349

आ. भांगडिया यांची उपस्थिती

नेरी : आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज इथे उभा आहे. आपण टाकलेला विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. दिलेल्या शब्दाला जपणारा सेवक असून आपली सेवा करण्याची संधी आपण मला दिली आणि तुमच्या आशीर्वादाने जो विश्वास माझ्यावर टाकला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. असे प्रतिपादन आमदार बंटी भांगडिया यांनी नेरी येथे आयोजित माँ माणिकादेवी परिसरातील सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

.     नेरी येथे 25:15 निधी अंतर्गत 100 लक्ष रुपये किंमतीचे माँ मानिका देवी परिसरात सामाजिक सभागृह व खनिज विकास निधी अंतर्गत 30 लक्ष रुपये किंमतीचे स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन सोहळा दि 7 ऑक्टोबर ला आयोजित करण्यात आला या भूमिपूजन सोहळ्याचे भूमिपूजन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले सदर दोन्ही सभागृहाचे निधी उपलब्ध झाला असून लवकरच बांधकामाला सुरवात होऊन पुर्णत्वास जाईल असे आमदार भांगडिया यांनी सांगितले.

.     आमदार बंटी भांगडिया यांच्या आगमन होताच ढोल ताशा च्या निनादात पुष्प उडवून जोरदार स्वागत करण्यात आले सर्वप्रथम नवीन बांधकाम करण्यात येणाऱ्या सभागृहाचे विधिवत पूजा अर्चा करून कुदड मारून फीत कापून भूमिपूजन करण्यात आले.

.     याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रु दडमल गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू पा. झाडे तालुका अध्यक्ष भाजपा, डॉ श्याम हटवादे जेष्ठ नेते भाजपा, राजू देवतळे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग, मनीष तुम्पलिवार प्रदेश सचिव भाजयुमो, प्रकाश वाकडे भाजपा आदिवासी नेते, माया ननावरे महिला आघाडी अध्यक्ष, नीलम राचलवार जेष्ठ नेते भाजपा, कमलाकर लोणकर, दत्तू पिसे, संदीप पिसे, समीर राचलवार, ओम खैरे, सरोज चौधरी, दिगंबर जांभुळे, नानाजी दडमल, ईश्वर रंदये आदी सह अनेक माना समाज बांधव महिला भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जांभुळे संचालन वैभव चौधरी, आभार केशनी जीवतोडे यांनी केले.

error: Content is protected !!